Search This Blog

Thursday, 10 July 2025

तृतीयपंथीय तक्रार निवारण समिती सदस्यपदासाठी अर्ज आमंत्रित

 तृतीयपंथीय तक्रार निवारण समिती सदस्यपदासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि. 10 जुलै : जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्त करण्यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

समितीत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर हे सदस्य सचिव असतील. तसेच जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेली सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी एक व्यक्ती व तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेतील दोन तृतीयपंथीय व्यक्तींची (त्यापैकी किमान एक ट्रान्सवुमन असणे आवश्यक) सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीय समुदायासाठी कार्य करणाऱ्या संस्थांमधील तृतीयपंथीय व्यक्तींनीतसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी दिनांक 20 जुलै 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा आवश्यक निवेदन सादर करावेअसे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment