Search This Blog

Sunday, 1 March 2026

खारघर येथे श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद




 खारघर येथे श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

 

नवी मुंबई, दि. 28 : मानवतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिख पंथाचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त खारघर येथे भव्य जनकल्याण चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कोश यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमास देशभरातून आलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समागमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या आरोग्याची सर्वंकष काळजी घेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत बहुआयामी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात फिजिओथेरपी सेवा कक्षदंतरोग तज्ज्ञ कक्षअस्थिरोग तज्ज्ञ कक्षकान-नाक-घसा तज्ज्ञ कक्षहृदयरोग तज्ज्ञ कक्षमेडिसिन विभागतसेच ईसीजी व रक्तदाब तपासणी कक्ष यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे कॅन्सर स्क्रीनिंग चाचण्या आणि मोफत केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकी जपत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. गरजू रुग्णांसाठी मोफत औषध वाटपाचीही सोय करण्यात आली होती.

या शिबिरात एमजीएम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे डीन डॉ. जी. एस. नरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रदीप सावर्डेकरडॉ. नव्या बाबूडॉ. आदित्य ढाकणेडॉ. मोहिनी धर्मा आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा दिली. तसेच नवी मुंबई महानगरपालिकापनवेल महानगरपालिकाकल्याण डोंबिवली महानगरपालिकाउल्हासनगर महानगरपालिकाठाणे महानगरपालिका तसेच आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.

भाविकांनी मोठ्या संख्येने विविध तपासण्या करून घेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले. आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे समागमाला सामाजिक उत्तरदायित्वाची भक्कम जोड मिळाली. मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित या आरोग्य शिबिराने “सेवा हीच खरी श्रद्धांजली” हा संदेश अधोरेखित करत समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला.

00000

 

शैलजा पाटील/संध्या गरवारे/कोकण भवन पथक

शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीख' प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण



 शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीखप्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण

 

शीख योद्ध्यांनी वापरलेली शस्त्रात्रे पाहण्याची संधी

 

शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची  सोप्या भाषेत आकर्षक सचित्र मांडणी

 

मुंबईदि.28: : खारघर ओवे मैदान येथे सुरू असलेल्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त शीख समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे 'विरासत-ए-सीखहे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत असून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले भाविक आवर्जून प्रदर्शनाला भेट देत आहेत.

शीख धर्माच्या स्थापनेपासून ते गुरू गोविंद सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व गुरूंचा इतिहासत्यांनी दिलेले योगदान सचित्र स्वरूपात मांडण्यात आला आहे. विशेषतः हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबत शीख योद्ध्यांनी वापरलेली विविध शस्त्रास्त्रे या प्रदर्शन दालनात ठेवण्यात आली आहेत. शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक जी ते शेवटचे गुरु गोविंद सिंगजी यांचा इतिहास व श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य तसेच शीख धर्मासोबतच सिकलीगरबंजारालबानासिंधीमोहयालवाल्मिकीउदासीन व भगत नामदेव समाजातील महापुरुषांचाही इतिहास या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे.

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहिदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले भाविक आवर्जून 'विरासत-ए-सीखया प्रदर्शनाला भेट देत आहेत.

0000000

खारघरमध्ये ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी 350 वा शहिदी समागम निमित्त भव्य पार्किंग व्यवस्थेची तयारी


 

खारघरमध्ये हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी 350 वा शहिदी समागम निमित्त भव्य पार्किंग व्यवस्थेची तयारी

महामार्गापासूनच मार्गदर्शक फलक

कलर कोडिंग नुसार पार्किंगची व्यवस्था

खारघरदि. 28 : अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे 28 फेब्रुवारी व मार्च रोजी आयोजित हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी भाविकांच्या सोयीसाठी व्यापक आणि रंग-कोडनिहाय 33 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन बसकार आणि दुचाकींसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक पार्किंग स्थळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी मोफत पिकअप आणि ड्रॉप सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन पार्क केल्यानंतर भाविकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. ओला-उबरसह सर्व टॅक्सी सेवांसाठी देखील स्वतंत्र पिकअप-ड्रॉप पॉइंट्स निश्चित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी ब्ल्यू, ‘ऑरेंज’ आणि पिंक’ अशा तीन रंगांमध्ये पार्किंगचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक रंगानुसार विशिष्ट मार्ग व जिल्हे निश्चित करण्यात आले असूनत्यानुसार वाहनचालकांना पार्किंग स्थळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

ब्ल्यू पार्किंग (नाशिकधुळेजळगावनंदुरबारछत्रपती संभाजीनगरअहमदनगर आदी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी)

ओवे कॅम्प मैदानइनामपुरी क्रिकेट मैदानश्री सत्य साई हॉस्पिटल परिसरमेट्रो स्टेशनजवळील मैदाने आदी ठिकाणी बस व कार पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या विभागात सुमारे 550 बसेस आणि 1135 कार पार्किंगची क्षमता उपलब्ध आहे.

ऑरेंज पार्किंग (रायगडरत्नागिरीसिंधुदुर्गपुणेसांगलीसाताराकोल्हापूरसोलापूर आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी)

पापडीचा पाडा सर्कलसेक्टर 35 ईसेक्टर 333227 आणि 23 मधील विविध मैदाने येथे मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था आहे. या विभागात 400 बसेस आणि तब्बल 4990 कार पार्किंगची क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पिंक पार्किंग (मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेपालघर येथून येणाऱ्या वाहनांसाठी)

सेक्टर 24141116748 आणि 10 मधील मैदाने तसेच लिटल वर्ल्ड मॉल परिसर येथे वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. या विभागात 200 बसेस आणि 2560 कार पार्किंगची सुविधा आहे.

याशिवायकार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी सेंट्रल पार्कसेक्टर 6 परिसर आणि गुरुद्वारामागील टनेल रोड येथे स्वतंत्र पार्किंग राखीव ठेवण्यात आले आहे. येथे सुमारे 1450 कार आणि 1000 मोटारसायकली उभ्या करण्याची क्षमता आहे.

महामार्गपासून मार्गदर्शक फलक

कार्यक्रमादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुलभ प्रवेश मिळावा यासाठी प्रशासनकडून मार्गदर्शक फलकस्वयंसेवक आणि पोलीस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात आली. आयोजकांनी भाविकांनी दिलेल्या रंग-कोडनुसार पार्किंगचा वापर करावाअसे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

वाहतूक व्यवस्था व पार्किंग व्यवस्थेबद्दल नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त (वाहतूक ) तिरुपती काकडे यांनी सांगितले कीखारघर येथे हिंद दी चादर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या परिसरामध्ये जवळपास 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी पिकअप आणि ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेम्हणजेज्या ठिकाणी पार्किंगमध्ये आपण वाहन लावालतिथून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोफत पिकअप आणि ड्रॉपची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबरया ठिकाणी येणारे ओलाउबर आणि टॅक्सी यांच्यासाठीसुद्धा पिकअप आणि ड्रॉपची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, 28 फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही दिवशी सकाळी 6:00 वाजल्यापासून ते रात्री 11:00 वाजेपर्यंत नवी मुंबईच्या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये जड आणि वाजड वाहनांना प्रवेश करण्यास आणि पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबरखारघरमध्येसुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणूनकाही ठिकाणी रस्तेपर्यायी रस्ते निर्माण केलेले आहेत आणि काही रस्त्यांवरती वाहतूक प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणूनवाहतूक शाखेकडून एक डीसीपीएक एसीपी, 20 अधिकारी आणि 500 अंमलदार यांच्यासोबत 500 वार्डन नेमण्यात आलेले आहेतज्यामुळे वाहतूक जी आहेती सुव्यवस्थित राखण्यासाठी मदत होईल.

 काही ठिकाणी वाहनं बंद पडण्याची संभावना लक्षात घेतापुरेशा प्रमाणात क्रेन नेमण्यात आलेले आहेत. टोइंग व्हेईकल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व पार्किंगच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र साइन बोर्ड्स  लावण्यात आलेले आहेत. एकंदरीतया कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीयासाठी वाहतूक पोलीस आणि नवी मुंबई पोलीस सज्ज आहेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

शैलजा पाटील/संध्या गरवारे/कोकण भवन पथक

हिंद-दी-चादर’ निमित्त बंजारा महिलांचे पारंपरिक नृत्य सादरीकरण



 हिंद-दी-चादर निमित्त बंजारा महिलांचे पारंपरिक नृत्य सादरीकरण

 

नवी मुंबईदि. २८ : “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त खारघरनवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

            रंगीत पारंपरिक वेशभूषा आणि आकर्षक दागिने परिधान करून सादर केलेल्या नृत्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे आणि सांस्कृतिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले. विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

सादरीकरणाच्या माध्यमातून धर्मसंस्कृती आणि परंपरांचा संगम पाहायला मिळाला. बंजारा समाजाच्या महिलांनी आपल्या सादरीकरणातून एकताबंधुता आणि सांस्कृतिक वैविध्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता आणि मानवतेचा विचार अधिक दृढ करण्यात आला.

00000

 

शैलजा पाटील/संध्या गरवारे/कोकण भवन पथक

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमात सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन


 

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमात सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन

            नवी मुंबईदि. 28 :  हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात नऊ समाजांचा उत्स्फूर्त सहभागाने विविध समाजपंथ आणि घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन घडले.

या कार्यक्रमात सिखसिकलीगरबंजारालबानासिंधीमोहयालवाल्मीयमउदासीन तसेच संत नामदेव महाराजांच्या वारकरी (भगत नामदेव) संप्रदायातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग सर्व समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित राहून एकताबंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. श्रद्धासेवा आणि समतेच्या विचारांवर आधारित कार्यक्रमात सर्वांनी शांततेत आणि शिस्तीत सहभाग घेतला.

कार्यक्रमस्थळी सर्व समाजांनी परंपरासंस्कृती आणि धार्मिक मूल्यांचा सन्मान राखत शांततेत सहभाग घेतला. विविध समाजांच्या उपस्थितीमुळे हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता व मानवतेचा विचार अधिक दृढ करण्यात आला.

0000

शैलजा पाटील/संध्या गरवारे/कोकण भवन पथक