Search This Blog

Monday, 22 November 2021

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 5 कोरोनामुक्त

 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 5 कोरोनामुक्त

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 13

चंद्रपूर, दि. 22 नोव्हेंबर :  जिल्ह्यात सोमवारी (दि.22) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी  कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सोमवारी मृत्यू संख्या शुन्यावर आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 842 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 286 झाली आहे. सध्या 13 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 54 हजार 125 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 64 हजार 34 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

नोव्हेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 




नोव्हेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा

- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø आरोग्य विभागाच्या टिम प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहचणे आवश्यक

चंद्रपूर दिनांक 22 नोव्हेंबर : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोविड लसीकरणाकडे बघितले जाते. परंतु अद्यापही नागरिकांमध्ये कोविड लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. काही तालुक्यांमध्ये नागरिकांचे लसीकरण अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर  काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

काही तालुक्यात अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, गावनिहाय सुक्ष्म नियोजन करून लस न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, दिलेले लक्ष समोर ठेवून कामे करावीत. तालुका व गावनिहाय अजून किती लाभार्थी लसीकरणासाठी शिल्लक आहेत, याची माहिती घ्यावी. शिल्लक असलेल्या नागरिकांची यादी तयार करावी. जिल्हा प्रशासनाद्वारे ‘हर घर दस्तक’ ही मोहिम राबविली जात आहे. त्या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या दारापर्यंत आरोग्य कर्मचारी गेलेत का याची माहिती घ्यावी, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री.गुल्हाने पुढे म्हणाले, शेतीचा हंगाम असल्याने ग्रामीण भागातील नागरिक सकाळच्या सुमारास शेतात निघून जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे वेळेत लसीकरण व्हावे यासाठी सकाळी 8 वाजता लसीकरण केंद्र सुरू झाले पाहिजे. नेमून दिलेले संपर्क अधिकारी व पालक अधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्राला नियमीत भेट द्यावी. लसीकरण केंद्रावरील लसीचा मुबलक साठा, लसीकरण करणारे कर्मचारी याबाबत माहिती घ्यावी. त्यासोबतच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत लसीकरणास प्रोत्साहित करावे. तालुक्यातील उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांनी लसीकरणासंदर्भात नियमित आढावा घ्यावा. तसेच सकाळी लसीकरण केंद्राला भेट द्यावी.

पालक अधिकारी, नोडल अधिकारी वेळेत पोहोचतात का, लसीकरण केंद्र सकाळी नियमित उघडतात का आदींची याची खात्री करावी. प्रत्येक गटविकास अधिकारी यांना लसीकरणासाठी गावे नेमून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. येत्या 24 नोव्हेंबरपासून स्वत: तालुक्यातील लसीकरण केंद्राला भेट देणार असून यावेळी कार्य दिसत नसल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करणार असल्याचेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले.

21 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात 13 लक्ष 80 हजार 237 नागरीकांचा पहिला डोज तर 5 लक्ष 33 हजार 196 नागरिकांचे दोन्ही डोज असे एकूण 19 लक्ष 13 हजार 433 डोज देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम यांनी उपस्थितांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी व्हिसीद्वारे संवाद साधून तालुकानिहाय लसीकरणाचा आढावा घेतला.

00000





Sunday, 21 November 2021

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 3 कोरोनामुक्त


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर3 कोरोनामुक्त

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 18

चंद्रपूरदि. 21 नोव्हेंबर :  जिल्ह्यात रविवारी (दि.21) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी  कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर रविवारी मृत्यू संख्या शुन्यावर आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 842 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 281 झाली आहे. सध्या 18 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 53 हजार 766 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 63 हजार 672 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000000

मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅली

 







मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅली

Ø नवमतदारांनी नाव नोंदविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 21  नोव्हेंबर :  भारतीय निवडणूक आयोगाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदारांची नावेस्थलांतरीत नागरिकांची नावे यादीत समाविष्ट करणेमृतकांची नावे वगळणे किंवा यादीत काही चुका असेल तर त्याची दुरुस्ती करणेयाचा समावेश आहे. या बाबींची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वात शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.

सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरू होवून जटपुरा गेट- गिरणार चौक- गांधी चौक- जटपुरा गेट- डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय- वरोरा नाका- सिद्धार्थ हॉटेल समोरून परत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सांगता झाली.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री गुल्हाने म्हणालेभारतीय संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. आणि हा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा म्हणून निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील ज्या व्यक्ति 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करतीलत्यांनी आपली नावे आवर्जून मतदार यादीत नोंदवावी. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्ह्यात होऊ घातल्या आहेत. त्यासाठी ही यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे कोणीही मतदानापासून वंचित राहू नयेयासाठी नागरिकांनी आपापली नावे त्वरीत नोंदवावी व प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

सदर रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांच्यासह महानगरपालिकेचे उपायुक्तऔष्णिक विद्युत केंद्राचे प्रतिनिधीविविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीइंडियन मेडिकल असोसिएशनविद्यार्थी व नागरिक यांचा सहभाग होता.

00000

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी

 


वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला

15 लाखांची मदतपतीला नोकरी

Ø मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई / चंद्रपुरदि.  21 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाचत्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचेतसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत  घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असतानावाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच श्रीमती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

00000