Search This Blog

Tuesday, 25 January 2022

जिल्ह्यात मंगळवारी 352 कोरोनामुक्त तर 308 नवे बाधित

 

जिल्ह्यात मंगळवारी 352 कोरोनामुक्त तर 308 नवे बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3882

चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : जिल्ह्यात गत 24 तासात 352 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 308 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 87, चंद्रपूर 7, बल्लारपूर 33, भद्रावती 16, ब्रह्मपुरी 19, नागभीड 19, सिंदेवाही 6, मुल 23, सावली 8, पोंभूर्णा 5, गोंडपिपरी 4, राजुरा 24, चिमूर 25, वरोरा 3,कोरपना 24, तर जिवती येथे 5 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 95 हजार 144 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 89 हजार 714 झाली आहे. सध्या 3882 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 36 हजार 857 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 40 हजार 36 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1548 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा






 जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

            चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मंगळवारी (दि.25 जानेवारी) राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी नव मतदारांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते मतदार ओळख पत्र देण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व समाजात रुजावे यासाठी जिल्ह्यात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशाल कुमार मेश्राम, व इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. 25 जानेवारी 2020 रोजी 12 वा राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात 18-19 वर्ष वयोगटातील 5 नवीन मतदारांना पिवीसी मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी,राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने यांनी मतदारांना शपथ दिली व कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

00000

Monday, 24 January 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि.24 जानेवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि. 25 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथे आगमन व शहरातील वडगाव प्रभाग 8 मध्ये खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या जेपी सुपर बाजार ते श्री. मुलानी गजानन महाराज सिमेंट काँक्रीट रस्ता व लक्ष्मीनगर सर्वे नं.13/2 मधील जागेच्या सौंदर्यीकरण व विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सकाळी 11.45 वाजता चंद्रपूर शहरातील महाकाली (जोडदेऊळ) प्रभाग क्र. 12 (जोडदेऊळ, पठाणपुरा) मध्ये खनिज निधीअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या जोडदेऊळ विठ्ठल रुक्माई मंदिर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली  बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12.30 वाजता शहरातील बंगाली कॅम्प प्रभाग क्रमांक 4 मधील खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या महिला शक्ती क्रिडांगणाला वॉल कंपाऊंडचे बांधकाम व संविधान चौक (राजीव गांधी नगर) ते हेल्थ फार्मसी डी.आर.सी रोड पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.15 वाजता चंद्रपूर शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्र. 6 मध्ये खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या श्री. मनोज परसराम ते श्री. विश्वकर्मा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व श्री. सुनीलराव अंबाला यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 2 वाजता विवेक नगर तुकुम प्रभागांमध्ये खनिज निधीअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या श्री साजिद खान ते ए.एच.शेख, अनवर शेख ते कपिल कुरेशी आणि श्री. वरभे ते राहुल ट्रेडर्स शॉपपर्यंत काँक्रीट रोड व नाली

 

बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत संबंधित विभागातील विकास कामांचा आढावा बैठक. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावे एका तालुक्यात येतात व त्यांची ग्रामपंचायत दुसऱ्या तालुक्यात येत असल्याने एकाच तालुक्यात ठेवण्याबाबत आढावा बैठक. सायंकाळी 4.30 वाजता नियोजन भवन सभागृह येथे जिल्हा दिव्यांग अखर्चित निधी मधून नवीन योजना घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल संदर्भात कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या कामांच्या प्रगतीबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5.30 वाजता चंद्रपूर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल संदर्भात कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या कामांच्या प्रगतीबाबत कामाची पाहणी. सायंकाळी 6.30 वाजता होटेल सिद्धार्थ प्रेमियर, चंद्रपुर येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. रात्री 8.30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

बुधवार, दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7:40 वाजता गांधी चौक,चंद्रपुर येथे पक्षाच्यावतीने आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित. सकाळी 9.15 वाजता पोलीस ग्राउंड, चंद्रपूर येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12 वाजता चंद्रपूर येथून सावली कडे प्रयाण. दुपारी 1 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 2.15 वाजता पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय, सावली येथे नगरपंचायत सावली येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 3.15 वाजता बोथली ता. सावली येथे आगमन व प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत बोधली ते घेडेवाही ते सिंडोला रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित.  सायंकाळी 4 वाजता जिबगाव ता.सावली येथे आगमन व तालुक्यातील हिरापूर, बोथली, सावली, उसेगाव, जिबगाव, हरंबा, साखरी, लोंढोली, कढोली, कापसी, व्याहाड बुज रस्त्यावर मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 5.30 वाजता वाघोली बुटी, ता. सावली येथे आगमन प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत व्याहाड बु. ते वाघोली ते सामदा बु. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 6:30 वाजता वाघोली बुटी, ता. सावली येथून गडचिरोली कडे प्रयाण.

गुरुवार दि. 27 जानेवारी 2020 रोजी, सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिदेंवाही येथे आगमन व विश्रामगृह विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिदेंवाही येथे नगरपंचायत सिंदेवाही येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12.30 वाजता चारगाव (बेडगे) ता. सिंदेवाही येथे आगमन व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मेंढामाल ते जिवनापूर रस्त्यांचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 1:30 वाजता किन्ही ता. सिंदेवाही येथे आगमन व स्थानिक विकास निधी अंतर्गत गुरुदेव सांस्कृतिक सभागृह लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. दुपारी 3 वाजता कळमगाव ता. सिंदेवाही येथे आगमन व मुरमाडी, कळमगाव, कुकूडहेटी येथे आगमन व उमा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 4.30 वाजता वाकल ता. सिंदेवाही येथे आगमन व वाकल जामसाळा रस्त्यावर उमा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. तसेच खनिज विकास निधी अंतर्गत बौद्ध समाज मंदिर लोकार्पण सोहळा व अंगणवाडी लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. सायंकाळी 5.30 वाजता वाकल ता. सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

 

जिल्ह्यात सोमवारी 178 कोरोनामुक्त तर 529 नवे बाधित

 


जिल्ह्यात सोमवारी 178 कोरोनामुक्त तर 529 नवे बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3926

चंद्रपूर, दि. 24 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत आहे. जिल्ह्यात  गत 24 तासात 178 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 529 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात सोमवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 238, चंद्रपूर 68, बल्लारपूर 35, भद्रावती 30, ब्रह्मपुरी 17, नागभीड 19, सिंदेवाही 1, मुल 13, सावली 19, पोंभूर्णा 2, गोंडपिपरी 5, राजुरा 15, चिमूर 8, वरोरा 45,कोरपना 13, तर जिवती येथे 1 रुग्ण आढळून आले असून व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 94 हजार 836 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 89 हजार 362 झाली आहे. सध्या 3926 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 34 हजार 570 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 38 हजार 568 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1548 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणा-यांचे तातडीने लसीकरण करा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 



लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणा-यांचे तातडीने लसीकरण करा -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मूल येथे सीसीसी सेंटरला भेट

चंद्रपूर दि. 24 जानेवारी: कोरोना विषाणूचा तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण तातडीने करून घ्यावे. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. कोविड-19 तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सुविधा व तयारीबाबत  तहसील कार्यालय, मूल येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मुल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक, गट शिक्षणाधिकारी, मंडळ अधिकारी, नोडल अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याकरिता शिक्षकांचे आदेश काढण्याबाबत यापूर्वी आदेशित केले होते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, शिक्षकांमार्फत लसीकरण करण्याबाबत योग्य तो समन्वय साधला जात आहे का? त्यासंदर्भात शहानिशा करून आवश्यक कार्यवाही करावी. सर्व नोडल अधिका-यांनी लसीकरणाच्या अगोदरच्या दिवशी व लसीकरणाच्या दिवशी संबंधित गावांना भेटी द्याव्यात. नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करून लसीकरणाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना दिल्या. ज्या गावात लसीकरण आहे त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, ग्रामपंचायत सदस्य व संबंधित नोडल अधिकारी यांची दोन दिवसाअगोदरच व्हिसीद्वारे आढावा घ्यावा व संबंधितांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे असेही ते म्हणाले.

 जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने पुढे म्हणाले, बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेले अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांना पत्र द्यावे व त्या संदर्भात सूचित करावे. उपविभागीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आठवड्यातून किमान तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केंद्राला भेटी द्याव्या. कोविड केअर सेंटर येथे आवश्यक औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध राहील, याची काळजी घ्यावी. पीएसए ऑक्सीजन प्लाँटच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेऊन त्यासंबंधाने काम विहित मुदतीत पूर्ण करावे, कोव्हीड नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी पथके कार्यान्वित करावी व दोषी व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना तालुका प्रशासनाला दिल्या. 

जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने यांनी तहसील कार्यालय, मुल येथे कार्यान्वित असलेल्या कोविड नियंत्रण कक्ष व न्यू मॉडेल स्कूल येथे कार्यरत कोविड केअर सेंटरला भेट देत व्यवस्थेची पाहणी केली.

00000