Search This Blog

Saturday, 26 August 2023

संस्कारी शिक्षण घेऊन समाजाचे ऋण फेडणारा विद्यार्थी घडावा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार







संस्कारी शिक्षण घेऊन समाजाचे ऋण फेडणारा विद्यार्थी घडावा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

वरोरा येथील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी ई- अभ्यासिकेचे लोकार्पण

चंद्रपूरदि. 26 : शिक्षण हे केवळ पुस्तकी नव्हे तर संस्कारी असावे. आपण समाजाचे कोणीतरी लागतोया भावनेतून संस्कारी शिक्षण घेऊन ऋण फेडणारा विद्यार्थी या अभ्यासिकेतून घडावाअशी अपेक्षा राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

वरोरा येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन भोयरदेवराव भोंगळेडॉ भगवान गायकवाडमाजी नगराध्यक्ष एहतेशाम अलीश्रीमती जोगीरमेश राजुरकर आदी उपस्थित होते.

श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ई- अभ्यासिकेचे लोकार्पण झालेअसे सुरुवातीला घोषित करून पालकमंत्री श्री मुनगंटीवार म्हणालेनगरपालिकेने अतिशय चांगले नियोजन करून ही अभ्यासिका उभी केली आहे. रस्तापूल या भौतिक सुविधेच्या गोष्टी थोड्या उशिरा तयार झाल्या तरी जास्त फरक पडत नाहीमात्र देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी जेथे तयार होतातअशा शैक्षणिक सुविधा त्वरित उभ्या करणे आवश्यक आहे. इतर देशात आर्थिक संपन्नताभौतिक संसाधने आदी गोष्टी मुबलक प्रमाणात असल्यातरी तेथील जीवन हे सुखी- संपन्नच राहीलयाची शाश्वती नाही. मात्र आपला देशआपला समाज हा कुटुंबवत्सल आहे. हेच संस्कार आपल्याला सुरुवातीपासून मिळाले आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना अशा संस्कारी शिक्षणाची गरज आहे. शेवटी देशाच्या गुणसंपन्नतेवरच आनंदाचा इंडेक्स ठरत असतो.

पुढे पालकमंत्री म्हणालेचंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी शिक्षणात वाघासारखाच पराक्रम करावा. राज्याचा मंत्री व या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रपूरबल्लारशापोंभुर्णा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. आपण निर्माण केलेल्या वास्तूमधून प्रशासकीय अधिकारी घडतातयाचा आपल्याला मनापासून आनंद आहे. विद्यार्थ्यांनोखूप मोठे होऊन या शहराचे तसेच या जिल्ह्याचे नाव रोशन कराअसा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शैक्षणिक सोयी सुविधांना प्राधान्य : आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकूण 205 विकास कामे करण्यात आली आहे. जिल्ह्यात शैक्षणिक सोयीसुविधांना विशेष प्राधान्य असून बाबा आमटे अत्याधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. बल्लारपूर तयार करण्यात आलेल्या सैनिक शाळेतून भविष्यात देशासाठी लष्करी अधिकारी तयार होतील. बल्लारशा येथे सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्रचंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर 50 एकर मध्ये 560 कोटी रुपये खर्च करून एस. एन. डी. टी. विद्यापीठाचे उपकेंद्रचंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्रकृषी महाविद्यालयचंद्रपूर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा नवनवीन गोष्टी पूर्णत्वास येत आहे. एवढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज येथे घेतलेली पंचप्रण शपथ हा केवळ कार्यक्रम नाहीतर आपल्या हातून उत्तोमत्तम कार्य घडावेत्यासाठी हा संकल्प करण्यात आला आहेअसे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी वरोरा येथील शहीद योगेश डाहूले यांची वीरमाता पार्वताबाई आणि वीरपिता वसंतराव डाहूले यांचा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी अभ्यासिकेच्या परिसरात ना.मुनगंटीवार यांनी वृक्षारोपण करून श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

प्रास्ताविकात मुख्याधिकारी गजानन भोयर म्हणालेया ई - अभ्यासिकेसाठी पालकमंत्री यांनी खनिज विकास निधी अंतर्गत 3 कोटी 66 लक्ष रुपये मंजूर केले. या अभ्यासिकेमध्ये 30 संगणकपेंटिंग कक्षप्रतिक्षालयग्रंथालय स्टोअर रूम आदी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेश खुळे यांनी केले. यावेळी अभिजित मोटघरेसूरज पूनवटकरबाबासाहेब भागडेआकाश वानखेडेअमित गुंडावारओम मांडवकरअमित चवलेसुरेश महाजनसागर वझेआकाश भागडे यांच्यासह माजी नगरसेवकविविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

0000000

Friday, 25 August 2023

पहिल्यांदाच तयार होणार चंद्रपूर जिल्ह्याचे मराठी गॅझेटिअर


 

पहिल्यांदाच तयार होणार चंद्रपूर जिल्ह्याचे मराठी गॅझेटिअर

Ø नागरिकांच्या योग्य सुचना व अभिप्रायसाठी 1 महिना जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध

Ø पत्रकार परिषदेत जिल्हाधिका-यांची माहिती

चंद्रपूर, दि. 25 : ‘गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रोत्साहनामुळे व प्रधान सचिव विकास खारगे यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित होणार आहे. सदर गॅझेटिअर अंतिमरीत्या प्रकाशित करण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनार्थ तसेच योग्य सुचना व अभिप्राय नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिना उपलब्ध असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रपूर जिल्ह्याचे मराठीतील गॅझेटिअर हे दोन खंडात आणि जवळपास 1400 पानांचे राहणार आहे. यात जिल्ह्याचे प्राकृतिक स्वरूप, भुस्वरुप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती, राजघराण्यांचा इतिहास, आर्थिक व्यवस्था, महसूल प्रशासन, भूगोल, इतिहास, लोकप्रशासन, सिंचन, व्यापार, उद्योग, बँकींग सुविधा, वाहतूक व दळणवळण, प्राचीन अवशेष, ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्वीय महत्वाची स्थळे आदी तपशील यात अंतर्भूत आहे. विशेष म्हणजे गॅझेटिअर ग्रंथाच्या पारंपरिक मूळ संकल्पनेव्यतिरिक्त जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नव्याने झालेल्या संशोधनाचा व त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेऊन हे गॅझेटिअर तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती गॅझेटिअर मंडळाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात 25 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन दिवस व कार्यालयीन वेळेत सदर गॅझेटिअर नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील. गॅझेटिअर पाहून नागरिकांना याबाबत योग्य सुचना व अभिप्राय नोंदवायचा असेल तर रजिस्टरमध्ये तशी नोंद करावी. योग्य अभिप्राय व सुचनांचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला जिल्हाधिक-यांसह गॅझेटिअर संपादक मंडळाचे सदस्य अशोक सिंह ठाकूर, कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर आणि उपसंपादक प्र.रा. गवळी उपस्थित होते.

००००००

जिल्ह्यात क्रेडिट आऊटरीच कॅम्प कार्यक्रम

 जिल्ह्यात क्रेडिट आऊटरीच कॅम्प कार्यक्रम

चंद्रपूरदि.25: भारत सरकार वित्त मंत्रालयवित्तीय सेवा विभाग व राज्यस्तरीय बँकर्स समितीपुणे यांच्या सुचनेनुसार अग्रणी जिल्हा प्रबंधक आणि सर्व बँकांच्या सहकार्याने नियोजन भवनचंद्रपूर येथे क्रेडिट आऊटरीच कॅम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

            कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडामुख्य प्रबंधक पंकज चिखलेबँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक जितेंद्र मस्तमौलाबँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक प्रमोद साबळेसीडीसीसी बँकेचे अशोक पवारव्यवस्थापक राजकुमार जयस्वालजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोडएमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा आदींची उपस्थिती होती.

 व्यवस्थापक राजकुमार जयस्वाल यांनी  लोकांच्या वित्तीय साक्षरतेच्या जागृतीबद्दल विस्तृत माहिती दिली आणि सतर्क व सावध राहून बँकेची वित्तीय देवाणघेवाण करण्याची सूचना केली. तसेच नाबार्ड बँकेबद्दल व नवीन उद्योजक लाभार्थ्यांकरिता नाबार्डच्या विविध योजना व त्याचे लाभ आदींची माहिती त्यांनी समजावून सांगितली.

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांनी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व नागरिकपथविक्रेताव शेतकरी व नव उद्योजकांना माहिती देऊन संबंधित बँकेची संपर्क साधून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

एम.आय.डी.सीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी, जिल्ह्यात नवीन उद्योजक निर्माण व्हावे, यावर मार्गदर्शन करून एमआयडीसी मधील स्थापित उद्योजकांना वेळोवेळी नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी वित्तीय सहायता केल्याबद्दल आभार मानले.

०००००००

भद्रावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 सप्टेंबर रोजी उमेदवारांची मुलाखत

 

भद्रावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 सप्टेंबर रोजी उमेदवारांची मुलाखत

चंद्रपूरदि. 25 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाभद्रावती येथे 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आयटीआय शिल्प निदेशकांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्लंबरपंप ऑपरेटर कम मेकॅनिकमेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल (टेक्निकल स्कूल)मॅथ्स ड्रॉईंग आणि एप्लॉयबिलीटी स्कील याकरता तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

डिप्लोमाडिग्रीआयटीआय अधिक सीटीआयधारक व संलग्न ट्रेडचे उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. शैक्षणिक पात्रतेच्या माहितीकरीता www.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह नमुद स्थळी व वेळी उपस्थित राहावेअसे भद्रावती येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य,श्रीमती. प्रणाली दहाटे यांनी कळविले आहे.

००००००

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळास "अ" वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दया

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळास "अ" वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दया

Ø वनेसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आग्रही भूमिका

Ø ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मुंबईत केली सविस्तर चर्चा

मुंबई / चंद्रपूर, दि.25 : समाजात राष्ट्रभक्ती जागृत करतअंधश्रद्धा निर्मूलनजातिभेदाच्या निर्मूलनासाठी आणि ग्रामविकासाचे महत्व पटवून देण्यासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करणारे थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील  गुरूकुंज मोझरी येथील समाधी स्थळास "अ " वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळायला हवाअशी आग्रही भूमिका घेत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यासंदर्भात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. महाजन यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कीआत्मसंयमनाचे विचार ग्रामगीतेतून मांडणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1936 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. महाराजांच्या निर्वाणानंतर याच आश्रमातून त्यांचे विचार आजही जगापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अविरत सुरू आहे. गुरुदेव सेवा मंडळाद्वारे संचालित अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरीस्थित गुरुदेव सेवाश्रम ही केवळ वास्तू नसून प्रेरणाकेंद्र आहेऊर्जास्रोत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या समाधी स्थळाला "अ" वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी संपूर्ण गुरुदेव भक्तांची व राष्ट्रीय विचारसरणीच्या प्रत्येकाची मागणी आहे.

गुरुकुंज मोझरी येथे दरवर्षी  जगभरातून लाखो भाविक भेट देत देतात. महाराजांच्या विचारांचे सोने सर्वत्र पसरवितात त्यांना व तेथे कार्य  पुढे नेणाऱ्या गुरुदेव सेवा मंडळाच्या पाठीशी शासनाने सर्व बाजूने उभे राहण्याची आवश्यकता आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृतकाळ सध्या सुरू असून याच काळात या प्रेरणास्थळाला "अ" वर्ग तीर्थक्षेत्रासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशी विनंती श्री. मुनगंटीवार यांनी केली.

००००००