Search This Blog

Saturday, 30 December 2023

जेवणाचा दर्जा आणि व्यवस्था एकदम उत्तम

 



जेवणाचा दर्जा आणि व्यवस्था एकदम उत्तम

Ø खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केल्या भावना

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक

चंद्रपूर,दि. 30 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून तालुका स्तरावर प्रथमच होणा-या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नियोजनाने येथे आलेले खेळाडू आणि प्रशिक्षक भारावून गेले आहेत. जिल्ह्यात आगमन होताच खेळाडूंच्या स्वागतापासून तर जेवण आणि निवासाच्या व्यवस्थेबद्दल त्यांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे येथे असलेला जेवणाचा दर्जा आणि व्यवस्था एकदम उत्तम असल्याच्या भावना खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकूल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास 1600 खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आदी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाहेरून येणारे खेळाडू, प्रशिक्षक व सर्वांची निवास, भोजन, वाहतूक आदी व्यवस्था अतिशय दर्जेदार करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनला दिल्या होत्या. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा व बैठका घेऊन अतिशय सुक्ष्म नियेाजन करून घेतले. त्याचीच फलश्रुती म्हणून येथे आलेल्या खेळाडूंनी व्यवस्थेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी हरयाणा येथून ॲथलेटिक्स शॉर्ट पुल स्पर्धेत सहभागी होणारी तमन्ना म्हणाली, येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था अतिशय उत्तम करण्यात आली आहे. येथे येऊन खुप छान वाटत आहे. खेळाडूंसाठी प्रशासनाने सर्वच व्यवस्था दर्जेदार केल्या आहे. तर तमन्नाचे प्रशिक्षक म्हणाले, खेळाडूंना जेवण वेळेवर विशेष म्हणजे ग्राऊंडजवळ मिळत आहे, ही वाखाणण्याजोगी बाब आहे.

अशी आहे भोजन व्यवस्था : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान विसापूर तालुका क्रीडा संकूल येथे रोज 2500 ते 3000 जणांसाठी सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण, सांयकाळी चहा-कॉफी आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत खेळाडू, प्रशिक्षकांना नास्ता दिला जातो. यात दिवसनिहाय मिसळ पाव, उपमा, पोहे, साबुदाणा खिचडी, वडासांबार, फळे, ब्रेड बटर, टी-कॉपी यांचा समावेश असतो. दुपारचे जेवण 12.30 ते 3.30 यावेळेत दिले जाते. याय दोन भाज्या (मिक्स व्हेज, वांगे, आलूमटर, सोयाबीन मटर व इतर भाज्यांपैकी कोणत्याही दोन) कडी, वरण, मसाला भात, पोळ्या, लोणचे, पापड, ग्रीन सलाद, चटणी आणि एक स्वीट यांचा समावेश असतो. तर रात्रीच्या जेवणात एक व्हेज भाजी व इतर पदार्थ दुपारच्या जेवणाप्रमाणेच असून रोज नॉन-व्हेज तयार करण्यात येते. तसेच कधी रबडी, व्हेजपुलाव, हलवा, आईसस्क्रीम आणि दूध देखील देण्यात येत आहे. भोजनाची संपूर्ण व्यवस्था बघण्यासाठी 250 ते 300 जणांची टीम कार्यरत आहे.

००००००

एफडीसीएम कडून राज्य शासनाला मिळणार 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश!


 एफडीसीएम कडून राज्य शासनाला मिळणार 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश!

Ø महामंडळाच्या स्थापनेपासून मिळालेली आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम

Ø वनविभाग सतत अग्रेसर असल्याचे समाधान : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि. 30 : महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला यावर्षी सन 2022-2023 या वर्षासाठी 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश मिळणे प्रस्तावित असून महामंडळाची स्थापना झाल्यापासून शासनाला प्राप्त होणारा हा सर्वाधिक मोठा लाभांश आहे. 28 डिसेंबर  रोजी नियोजन भवन येथे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महामंडळाच्या संचालक मंडळाच्या (बोर्ड) मिटिंग मध्ये ही माहिती मिळताच श्री. मुनगंटीवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे महामंडळाची स्थापना झाल्यापासून राज्य शासनाला मिळणारा हा सर्वाधिक मोठा लाभांश आहे. एफडीसीएम च्य अहवालबाबत सीएजी ने देखील "नील" चा शेरा देऊन अहवाल पारदर्शी असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. ही देखील मोठी उपलब्धी आहे.

यासंदर्भात बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्य शासनाला वनविकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक फायदा होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून काम करणाऱ्या मोजक्याच महामंडळाकडून आर्थिक लाभ शासनाला मिळतो, त्यात वानविभाग कुठेही मागे नाही. तर सतत अग्रेसर असल्याचे अत्यंत समाधान आहे. वनक्षेत्र विकास, बांबू लागवडीला प्रोत्साहन, विक्रमी वृक्ष लागवड, उत्तम दर्जाचे सागवान लावून योग्य विपणन व्यवस्था यासह प्रत्येक बाबतीत वन विकास महामंडळाचे नियोजन उल्लेखनीय आहे. अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरासाठी गेलेले काष्ठ, संसदेच्या नवीन इमारतीत सेंट्रल व्हिस्टासाठी गेले काष्ठ महाराष्ट्राच्या वन क्षेत्रातून गेले याचे मला विशेष समाधान आहे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. एफडीसीएम चे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वनबल प्रमुख शैलेश टेम्भूर्णीकर आणि त्यांच्या टीम च यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.

वन संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी श्री. मुनगंटीवार यांच्या कुशल नेतृत्वात वनविभाग झपाट्याने प्रगती करीत आहे. नवनवीन संकल्पना राबवून वनक्षेत्र वाढीसाठी तसेच वनांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचे काम गतीने सुरू आहे. एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी ची निर्मिती करून फार्निचर व इतर साहित्याकरिता मोठे दालन उभे करण्याचा त्यांचा मानस आहे. यामुळे उद्योगाला आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. वनविकास महामंडळाकडून गेल्या 10 वर्षात शासनाला मिळालेल्या लाभांशाचा आढावा घेतल्यास तो  सन  2014-2015 मध्ये 45.42 लक्ष रुपयांपासून  2022-2023 मध्ये 582.00 लक्ष रुपये असा प्रगतीचा आलेख अधोरेखित होतो.

००००००००

वनरक्षक पद भरती विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वनविभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार


वनरक्षक पद भरती 

विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वनविभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार

Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय

चंद्रपूर, दि. 30 : पेसा कायद्यांतर्गत येणा-या गावातील वनरक्षक पदे सोडून इतर पदे तात्काळ भरण्यासाठी राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत  सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा या दृष्टीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्याशी चर्चा करून सदर भरती प्रक्रियेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या हिताकरीता राज्य सरकार, वन विभाग आणि मी स्वतः संवेदनशील असून त्यांना दिलासा मिळावा, असा आमचा उद्देश आहे. त्यामुळे या विद्यार्थांचे हित प्राधान्यक्रमावर आहे, म्हणूनच हा निर्णय घेत असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नियुक्त करण्याची कार्यवाही करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

हजारो उमेदवारांनी वनरक्षक या पदाची परिक्षा दिली असून केवळ पेसा क्षेत्राच्या अधिसुचनेसंदर्भात संपूर्ण निकाल जाहीर न होऊ शकल्याने अनेक उमेदवार निकालाची वाट बघत आहेत. ही बाब वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हा विषय गांभिर्याने घेऊन वनविभागाला सुचना केल्या. पेसा क्षेत्र वगळता वनरक्षकाची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यालयालयाला याबाबत विनंती करणार आहे. यासाठी विशेष वकील नेमण्यात येईल.  जेणेकरून इतर क्षेत्रातील वनरक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग सुकर होईल.

वन विभागातील लघुलेखक (उच्चश्रेणी )(गट ब) (अराजपत्रित), लघुलेखक (निम्मश्रेणी )(गट ब) (अराजपत्रित), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब) (अराजपत्रित), वरिष्ठ सांख्यिकी सहायक (गट क) कनिष्ठ सांख्यिकी सहायक (गट क) या राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल (गट क), सर्व्हेक्षक (गट क) व वनरक्षक (गट क) या पदांच्या भरतीसाठी दिनांक 8 जून 2023 रोजी जाहिरात देण्यात आली होती. वरील जाहिरातीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात 5.5 लक्ष अर्ज प्राप्त झाले. वनविभागाची भरती प्रक्रिया ही टी.सी.एस.आय.ओ.एन या कंपनीमार्फत राबविण्यात आली असून त्यांच्याकडून उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ही राज्याच्या विविध 129 केंद्रावर दि. 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आली. यापरिक्षेकरीता 86.49 टक्के उमेदवार उपस्थित होते.

भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे जसे ॲन्सर की देणे व त्यावर आक्षेप मागविणे, आक्षेपांचे निवारण करणे, अंतिम ॲन्सर की देणे ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली. तसेच वनरक्षक वगळता ऑनलाईन परिक्षेचा निकाल 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. मात्र राज्यपाल यांच्या 29 ऑगस्ट 2019 अन्वये पेसा क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीसाठी अधिसुचित करण्यात आली आहे. या अधिसुचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या प्रकरणी पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सुचना आहेत. त्यामुळे वनरक्षक पदाचा निकाल जाहीर करण्यात आला नाही.

००००००

Friday, 29 December 2023

राष्ट्रीय खेळ प्रत्यक्षात बघण्यासाठी ग्रामीण भागातील 3 हजार विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेला भेट


 

राष्ट्रीय खेळ प्रत्यक्षात बघण्यासाठी ग्रामीण भागातील 3 हजार विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेला भेट

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या सुचना

चंद्रपूर, दि. 29 : तालुका क्रीडा संकुलविसापूरयेथे सुरू असलेल्या 67 व्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात बघण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील 3 हजार विद्यार्थ्यांनी बल्लारपूर क्रीडा संकूल येथे भेट दिली व खेळाडूंचा थरार अनुभवला.  

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात बघता यावी व त्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांची खेळामध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हयातील इयत्ता 7 ते 12 च्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेस भेट देण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी केले. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना निर्देश देऊन तालुकानिहाय 100 विदयार्थ्यांचे नियोजन करण्यात आले.

           प्रति दिवस प्रत्येक तालुका 100 विद्यार्थी याप्रमाणे दिवसाला 1500 विद्यार्थी असे दोन दिवसात एकूण 3000 विदयार्थ्यांनी या स्पर्धेस भेट दिली आहे. तसेच दिनांक 30 डिसेंबर 2023 ला 1500 विदयार्थ्यांची भेट नियोजित आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाकरीता विद्यार्थ्यांमध्ये व पालकामध्ये प्रचंड उत्साह आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार विदयार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

      तालुका स्तरावरुन प्रत्यक्ष क्रीडा संकुलापर्यंत विद्यार्थी आणण्यासाठी परिवहन विभागातर्फे बसेची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरेमोटार वाहन निरीक्षक विलास ढेंगणेसहा. मोटार वाहन निरीक्षक नरेंद्र उमाळेचेतन गरुकर यांच्यासह विद्यार्थ्यांची ही भेट यशस्वी व्हावी, यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,  सर्व तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी यांनी सहकार्य केले.

००००००

राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस









 राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस

Ø 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राचा जेसन कॅस्टेलीनो 11.03 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल

चंद्रपूर दि.29 : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या  67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या विविध सामन्यात विजयी होण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करीत असल्याने स्पर्धेत आता चांगलीच चुरस वाढली आहे.

आज मुली व मुलांच्या 19 वर्षाखालील गटातील थाळी फेकगोळा फेकतिहेरी उडीबांबू उडी1500 मीटर,  400 मीटर व 100 मीटर धावण्याची स्पर्धा4X100 रिले5000 मीटर चालने (मुले)3000 मीटर चालने (मुली) या स्पर्धेच्याअंतिम सामन्यात खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावत विजय मिळविला. तर प्रथम फेरीसाठी 800 मीटर200 मीटर व 400 मीटर अडथळ्याची शर्यतगट-अ व गट-ब च्या पात्रता फेरीसाठी भाला फेकथाळी फेकलांब उडी च्या सामन्यातही स्पर्धेत चांगलीच रंगत आली.

आज झालेल्या विविध अंतिम सामन्यात 19 वर्षाखालील मुलांच्या गटातील 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या जेसन जेम्स कॅस्टेलीनो याने 11.03 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. आंध्रप्रदेशच्या वल्लीगी हिमतेजा याने 11.15 सेकंदात द्वितीय तर महाराष्ट्राच्याच दुर्वेश पवार याने 11.23 सेकंदाची

 

वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटातील 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत कौन्सिल फॉर द इंडियन स्कूलच्या सिया सावंत ने  11.65 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राच्या अलिझा मौला आणि तामिळनाडूच्या अभिनया आर. यांनी द्वितीय व तिसरा क्रमांक पटकावला. यात अलिझाने 12.17 सेकंदतर अभिनयाने 12.31 सेकंदाची वेळ नोंदवली.

मुलांच्या गटातील 5000 मीटर चालण्याची शर्यत हरयानाच्या सचिनने  20.26.15 मिनिटांमध्ये पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. उत्तर प्रदेशच्या नितीन गुप्ता आणि राजस्थानच्या सचिन गहरवाल यांनी द्वितीय व तिसरा क्रमांक पटकावला. यात नितीनने 20.27.86 मिनिटेतर सचिन ने 20.39.11 मिनिटांची वेळ नोंदवली.  मुलींच्या गटातील 3000 मीटर चालण्याच्या शर्यतीत राजस्थानच्या खुशबू यादव ने  13.52.29 मिनिटांमध्ये अंतर पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. तर हरयानाच्या  पायल  आणि राजस्थानच्या कवीता दुडी  यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. यात पायलने 14.25.51 मिनिटेतर कवीताने 14.36.18 मिनिटांची वेळ नोंदवली.

मुलांच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या शहारूख खानने  प्रथम स्थान पटकावले. उत्तराखंडच्या प्रियांशूनने द्वितीय आणि हरयानाच्या बलजीत सिंगने तृतीय  क्रमांक पटकावला. तसेच मुलींच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत छत्तीसगडच्या सानिका राजुर्देने  प्रथम स्थानउत्तर प्रेशच्या अंशू हिने  द्वितीय  आणि तामिळनाडूच्या अन्सलीन हिने तिसरा क्रमांक पटकावला

मुलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत  केरळच्या अभिराम पी. याने  प्रथम स्थान पटकावले. पश्चिम बंगालच्या स्वपन अहिर याने दुसरा आणि कर्नाटकच्या एन. ध्रुव बल्लाल यांने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच मुलींच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्पर्धेत  केरळच्याच ज्योतिका एम. हिने प्रथम स्थान पटकावले. तर कर्नाटकच्या रिथाश्री आणि केरळच्या सारिका सुनिलकुमार यांनी द्वितीय व तिसरा क्रमांक मिळवला. 19 वर्षाखालील मुलांच्या लांब उडी स्पर्धेत मोहम्मद मुहासने 7.28 मीटर लांब उडी मारत अव्वल स्थान पटकावले. तर हरियानाच्या मोहम्मद अता साजीदने 7.22 मीटर उडी मारून द्वितीय आणि उत्तर प्रदेशच्या मोहम्मद तैसिफने 7.09 मीटर लांब अंतर नोंदवत तिसरे स्थान पटकावले.      उत्तरप्रदेशच्या अनुष्का यादव हिने हॅमर थ्रो मध्ये 65.38 मीटर अंतर नोंदवले.

०००००