Search This Blog

Wednesday, 28 August 2024

महिला व बालविकास विभागाचा 1098 क्रमांक ठरतोय मुलांसाठी वरदान


 महिला व बालविकास विभागाचा 1098 क्रमांक ठरतोय मुलांसाठी वरदान

Ø आधारलिंकच्या सहाय्याने मानसिक दिव्यांग मुलाच्या घरचा शोध

चंद्रपूरदि. 28 : हरविलेले मुलेघरातून पळून गेलेली मुलेभीक मागणारी मुलेबेघर मुलेबालकामगारतस्करीचे बळी मुलेशोषणग्रस्त मुलेअपंग - अनाथ मुलेशाळाबाह्य मुलेविधीग्रस्त मुलेव्यसनी मुलेतसेच असाह्य मुला- मुलांकरिता मिशन वात्सल कार्यक्रमांतर्गत 24 तास कार्य करणारी सेवा ‘जिल्हा चाईल्ड हेल्पलाईन’ व रेल्वे स्टेशनवर लहान मुलांसाठी ‘राष्ट्रीय आपत्कालीन टोल फ्री हेल्पलाईन सेवा क्रमांक 1098’ कार्यान्वित आहे.

1 जुलै 2024 रोजी  रेल्वे चाईल्ड लाईनला एक मानसिक दिव्यांग असलेला बेघर बालक रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथे आढळून आला. सदर मुलगा असहाय असल्यामुळे तसेच आपले नाव व पत्ता बरोबर  सांगत  नसल्याने  रेल्वेने पोलिस चौकी येथे बालक मिळाल्याची नोंद करण्यात आली. सदर बालकास काळजी आणि संरक्षण अंतर्गत  बालकल्याण समिती समोर सादर करण्यात आले. समितीने बालकाला तात्पुरत्या स्वरुपात  शासकीय मुलांचे  निरीक्षण गृह /बाल गृहचंद्रपूर येथे  दाखल केले. बालक आपला पत्ता बरोबर सांगत नसल्यामुळे पालकाचा शोध लावण्याची जबाबदारी बाल संरक्षण कक्ष अधिकारी व रेल्वे  चाईल्ड हेल्पलाईनला दिली.

4 जुलै रोजी मुलाचा पत्ता शोधण्यासाठी तहसील आधार केंद्रयेथे नोंद  केली. यावरून हरविलेला मुलगा रंगारेड्डी जिल्ह्यातील (तेलंगणा) असल्याची माहिती मिळाली. याआधारे जिल्हा बाल संरक्षण कक्षने रंगारेड्डी जिल्ह्याशी संपर्क साधला तर येथे  पोलिस स्टेशनला मुलगा हरवल्याची नोंद आढळून आली. बल्लारशहा रेल्वे स्टेशनवर तुमचा मुलगा मिळाला आहे, ही बाब पोलिसांनी मुलाच्या घरी सांगितली. त्याच्या वडीलांनी रेल्वे चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याशी संपर्क केला  आणि बालकल्याण समितीसमोर कागदपत्रे  सादर केली. त्यांनी सांगितले की चार महिन्यांपासून मुलगा घरून निघून गेला होता. अखेर बाल संरक्षण समितीच्या सहाय्याने वडील आणि मुलाची भेट घडून आली.   

या शोधकार्यात  जिल्हा महिला व  बाल विकास अधिकारी दीपक बानाईतजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, बल्लारपूरचे स्टेशन मास्टर रवींद्र नंदनवारबाल निरीक्षण गृहाचे सल्लागार नीलेश  जकुलवारचाइल्ड हेल्प लाईनचे निरीक्षक सुनील पाठकप्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले, भास्कर ठाकूरत्रिवेणी हाडकेबबिता लोहकरेधर्मेंद्र मेश्रामसुरेंद्र धोडरेविजय अमरथराज यांनी सहकार्य केले.

०००००

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन


 कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन

            चंद्रपूरदि. 28 : कापूस पीक हे सध्या 50 ते 60 दिवसांचे झाले असून बऱ्याच ठिकाणी फुलावर येत आहे. गुलाबी  बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळयाच्या स्वरुपात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयापासुनच दिसून येत आहे. किटकशास्त्र विभागाच्या चमूने शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या असताकपाशी जेथे फुलावस्थेत आहे अशा ठिकाणी डोमकळया आढळून आल्या आहेत. बोंड अळीचा प्रादुर्भाव 5 ते 7 टक्के पेक्षा जास्त आढळून आलेला आहे. सततचे ढगाळ वातावरण पिकावरील किडींना पोषक असते. किडींचे व्यवस्थापन  करण्यास उशीर केल्यास  या किडीचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढण्याची शक्यता असते, म्हणून  सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन करून या किडीमुळे होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते, असे कृषी विभागाने कळविले आाहे.

या उपाययोजनेचा अवलंब करावा : पिकातील डोमकळया नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढयांची रोकथाम  करता येईल. दर पंधरा दिवसांनी 5 टक्के निंबोळी  अर्काची किंवा ॲझेंडिरेक्टिन 300 पीपीएम 50 मिली किंवा 1500 पीपीएम 25 मिली प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.  कामगंध सापळयाचा वापर करावा. पिकाच्या उंचीनुसार किमान एक फुट उंच  अंतर ठेवावे, जेणेकरुन कामगंध सापळयाचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावेत.

पिक उगवणी नंतर 55 ते 60 दिवसांनी 12 ते 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॅायडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकाची 1.5 लक्ष अंडी (ट्रायको कार्ड) प्रति हेक्टरी सहा वेळा लावावीत.  गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवडयाला एकरी  शेताचे प्रतिनिधीत्व करतील, अशी 20 झाडे निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुलेपात्या व बोंडांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंडअळीग्रस्त फुलेपात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी 5 टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली सांगितल्याप्रमाणे रासायनिक‍ किटकनाशकाची  फवारणी करावी.

इंडोक्साकार्ब 14.50 टक्के एससी 10 मिली किंवा स्पिनेटोराम 11.70 टक्के एससी 9 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के इसी 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 टक्के एएफ 25 किंवा क्लोरपायारीफॅास 20 टक्के इसी 25 मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्याच्यावर आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून इमामेक्टीन बेन्झोएट 1.5 टक्के, प्रोफेनोफॉस 35 टक्के डब्ल्यूडीजी 14 ग्रॅम किंवा सायंट्रानिलीप्रोल 8 टक्के + डायफेनथ्युरॉन 40 एससी 13 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इमामेक्टीन  बेन्झोएट 1.1 टक्के डायफेनथ्युरॉन 30 एससी 20 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50+ फेनप्रोपेथ्रिन 5 टक्के इसी 30 मिली या पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील प्रकारे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे नियोजन करण्यात यावे., असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

०००००

सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा व पिवळा मोझॅक केवडा रोगाचे व्यवस्थापन

 

सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा व पिवळा मोझॅक केवडा रोगाचे व्यवस्थापन

चंद्रपूरदि. 28 : सद्यस्थितीत बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझेंक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिवळा मोझूक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणूंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस या विषाणुमुळे  होतो. कडधान्य आणि तणे ही रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीन 15 ते 17 टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. खालील प्रमाणे रोगाची लक्षणे ओळखून एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

रोगाची लक्षणे :

हिरवा मोझॅक : यामध्ये झाडाची पाने ही जाडसरआखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची  दिसतात. प्रादुर्भावामुळे  झाडाची  वाढ खुंटते. हा विषाणू बियाणे व  पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यत मावा या रसशोषक किडीद्वारे केला जातो.

पिवळा मोझॅक : सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी  विखुरलेल्या अवस्थेत पिवळया रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात, त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यायवर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अंरुद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. हा विषाणू पानातील  रसामार्फत  पसरतो आणि हा प्रसार पांढरी माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.

रोगास कारणीभूत घटक : केवडा रोग उबदार तापमानअति दाट पेरणी या रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरते. आद्र हवामानात हा रोग वाढत जातो. 

नुकसानीचा प्रकार : दोन्हीही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालांतराने फुल आणि शेंगा कमी लागतात. त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात. पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण  शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात. पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते.   तसेच दाण्यांमधील तेलाचे  प्रमाण  घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते.  त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करुन या रोगाचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

सोयाबीनवरील पांढरी माशीमावा आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन : काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी  पडतात . त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची  लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणाचीच लागवड करावी. पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा.  लागवडनंतर वेळोवेळी  पिकाचे  कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. मोझॅक (केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त झाडे  दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरुन नष्ट करावीत जेणेकरुन निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.  पांढऱ्या  माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये 12 इंच X 10 इंच  आकाराचे हेक्टरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे लावावेत. नत्रयुक्त खताचा संतुलित वापर करावा.  मूंग,उडीद यासारख्या पर्यायी  खाद्य वनस्पतीवरुन पिवळा मोडॉक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अशा पिकावरील  पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे. पीक तणमुक्त ठेवावे. 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

रोगाच्या प्रसारास  कारणीभूत असलेल्या नावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असिटामिप्रीड  25 टक्के + बाइफेन्द्रीन  25 टक्के डब्ल्यू जी 100 ग्रॅम (5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पपाने)  ( लेबल क्लेम कीटकनाशक ) किंवा थायमिथोक्झाम 12.6 टक्के लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6 टक्के डॉडसी 50 मिली (2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पपाने) (लेबल क्लेम) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर या प्रमाणात करावी.  वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पपासाठी आहे पेट्रोल पपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास 10 दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू 5 ते 7 असावा. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्माहातमोजे तोंडावर मास्क व सुरक्षित कपडयाचा वापर करावा तसेच घुटकातंबाखु खाऊ ‍ नये बीडी पिऊ नये. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी,  जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.

वरीलप्रकारे सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा व पिवळा मोझॅक केवडा रोगाचे नियोजन करण्यात यावे, असे आवाहन कृषी विद्यापीठ व कृषी  विभागामार्फत करण्यात येत आहे.

०००००

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थाना काम देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर या कार्यालयास 2 कंत्राटी शिपाई व आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकासरोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर यांचे 1 कंत्राटी  शिपाई पदे 6 महिन्याकरीता सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था मार्फत भरण्यात येत आहे. यासंबधी येथे जिल्हास्तरीय कामवाटप समिती नियुक्त करण्यात आली असून त्या समितीच्या वतीने या कार्यालयास नोंदणी असलेल्या सुशिक्षीत  बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना कामाचे वाटप करण्यांत येत आहे.

सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी 13 सप्टेंबर 2024 पर्यंत कार्यालयीन  वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधून या कार्यालयास अर्ज सादर करावे. विहित तारखेनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.  अर्जासोबत संस्थेची नोंदणी प्रमाणपत्रबँकेचे पासबूकची छायांकीत प्रतसन 2023-24 चे लेखापरिक्षण अहवालचालू असलेले सेवायोजन कार्डसभासद क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र व सदर सेवा सोसायटी कार्यरत असावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर यांनी केले आहे.

०००००

Tuesday, 27 August 2024

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे केंद्राकडून महाराष्ट्राला 401 कोटींचे थकीत अनुदान प्राप्त!


 वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे केंद्राकडून महाराष्ट्राला 401 कोटींचे थकीत अनुदान प्राप्त!

Ø केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मुनगंटीवारांनी मानले आभार

Ø राज्यातील नगर परिषदांच्या विकासाला मिळणार गती

चंद्रपूरदि. 27 : महाराष्ट्राला 15 व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या निधीचा मार्ग वनसांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यावासाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सुकर झाला आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः फोन करून महाराष्ट्राला 401 कोटीचे थकीत अनुदान देत असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांना दिली.  

केंद्र शासनाकडून 15 व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने महाराष्ट्राला मिळणारे सन 2023-24 चे नगरपालिका प्रशासन व नगर परिषदांसाठीचे अनुदान थकित होते. सदर अनुदान महाराष्ट्र शासनाच्या विविध नगरपालिका व नगर परिषदांकरिता अत्यंत आवश्यक होते. या निधी अभावी नगरपंचायतीनगरपालिका आणि महानगरपालिका अशा एकूण 421 ठिकाणी विविध विकास कार्य रखडलेली होती.

सदर निधी मिळवण्याकरिता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र लिहून आणि दूरध्वनीद्वारे महाराष्ट्र राज्यातील विकास कामांकरिता या निधीची किती आवश्यकता आहे, हे कळविले होते. यासंदर्भात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सतत पाठपुरावा केला. श्रीमती सीतारामन यांनी महाराष्ट्राला सदर निधीची आवश्यकता लक्षात घेऊन व मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या विनंतीला योग्य प्रतिसाद देत तसेच 13 ऑगस्ट 2024 च्या पत्राची दखल घेत तातडीने कार्यवाही करून सदरचा निधी महाराष्ट्र राज्याला मिळवून दिलेला आहे.

गतीप्रगती आणि विकासाकरिता अग्रही मुनगंटीवार!

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्या उत्तम प्रशासकीय कार्यासाठीअभ्यासू पद्धतीने लोकोपयोगी कार्याकरिता आग्रही स्वभावासाठी सुपरिचित आहेत. अर्थमंत्री म्हणून यशस्वी पद्धतीने कार्यभार सांभाळणारे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक क्षेत्रातील निधीची तरतूद आणि ती प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा याचा परिपूर्ण अभ्यास आहे. तसेच प्रशासनामध्ये  महाराष्ट्र राज्याच्या तळागाळातील विकास कामांकरिता सदैव ते तत्पर असतातच. जे काम हाती घेतले ते गतीने व्हावेविकासात्मक व्हावे व सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा व्हावा, ही त्यांची तळमळ असते.

म्हणूनच महाराष्ट्राचा केंद्राकडे वित्त आयोगाच्या अनुषंगाने सन 2023-24 चा निधी मिळवून नगरपालिका प्रशासन व नगर परिषदांकरिता मिळणाऱ्या अनुदानाचा विषय मार्गी लागावा, असा त्यांचा आग्रह होता. सदरचे अनुदान महाराष्ट्र शासनाच्या विविध नगरपालिका व नगर परिषदांकरिता अत्यंत आवश्यक होते. या निधी अभावी नगरपंचायतीनगरपालिका आणि महानगर पालिकामध्ये विविध विकास कार्य रखडलेली होती. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या या निर्णयामुळे व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.

००००००