Search This Blog

Friday, 21 February 2025

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 








मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Ø राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात

Ø स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – फडणवीस

Ø संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी -  तारा भवाळकर

चंद्रपूर/नवी दिल्ली दि.21 : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहेअसे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित  करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकरमावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे,  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबेकार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे कोषाध्यक्ष प्रकाश पागेसंमेलनाचे निमंत्रक संजय नहार  आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणालेमराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही. त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे.   1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.  या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वरांनी 'माझ्या मराठाचि बोलू कौतुकेअमृताते पैजा जिंकेअसे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहेअसेही श्री मोदी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी  वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभुमीवर हे संमेलन होत आहेअसे सांगून पंतप्रधान म्हणाले100 वर्षापूर्वी राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. वेदापासून विवेकानंदांपर्यंत  नव्या पिढीला पोहोचविण्याचा संस्कारयज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे. संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडले जाण्याची मला संधी मिळाली.  मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणालेमराठीत शुरतेसोबतच वीरता देखील आहेसौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेतसमानता आणि समरसता आहेमराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे. शक्तीभक्ती आणि युक्तीदेखील आहे. देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असतांना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले. संत ज्ञानेश्वरसंत तुकारामरामदाससंत गाडगे महाराजतुकडोजी महाराजगोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. आधुनिक युगात ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने समाजावर प्रभाव टाकला आहे.

गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराजसंभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारले. स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडकेलोकमान्य टिळकवीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली. मराठी साहित्याने देशप्रेमाची धारा प्रवाहीत झाली. या साहित्याने देशप्रेमाचा जागर केलाजनतेला नवी ऊर्जा दिली. अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणालेमराठी साहित्याने समाजातील वंचितशोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुलेसावित्रीबाई फुलेमहर्षि कर्वेडॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्यचे कार्य केले. मराठी भाषेने  समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले. मराठी भाषेने प्राचीन विचारांसोबत  विज्ञानही मांडले. महाराष्ट्राने प्रागतिक विचार स्विकारले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला पुढे नेले.

देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना प्रधानमंत्री म्हणालेभाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देतेविकासाशी जोडते,  भेद करीत नाही. भाषेने माणूसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे. मराठीने इतर भाषेतून साहित्य स्विकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले. अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतीतील  उत्तम साहित्याचे इतर भाषात भाषांतर झाले. भाषांनी स्वत: सोबत इतरांना समृद्ध केले. हा समरसतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे.

मराठीसोबत सर्व प्रमुख भाषेतून उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील युवक आता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेवू शिकेलअसे सांगून प्रधानमंत्री म्हणालेसाहित्य समजाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्य संमेलनसाहित्यिक संस्थांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे.  मराठीतीत महान विभूतींनी स्थापन केलेले आदर्श आणखी पुढे नेण्याचे कार्य महामंडळ करेलअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांद्वारे मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावेयुवकांच्या स्पर्धांचे आयोजन करावेअसे आवाहन त्यांनी केले. 

शिवाजी महाराजांकडून स्वभाषेचा आग्रह आणि अभिमान – फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेजगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसीऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 1737 मध्ये  मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी  दिल्ली जिंकणार आहे. विश्व मराठी संमेलनात पु.ल. देशपांडे म्हणाले होतेआपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे. ती लोकभाषा  होऊनलोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली.  संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली.  कलासाहित्यसंस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतातत्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून 100 वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईलअसेही श्री.फडणवीस म्हणाले.

संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी -  भवाळकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून डॉ.तारा भवाळकर म्हणाल्यामराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वरसंत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असूनती बोलली तर जीवंत रहाते. महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली  असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते.  या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे. मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारीजोडणारी गोष्ट असली पाहिजेतोडणारी नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातूनसाहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी - पवार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगून श्री.पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री. मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणालेसंत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले. महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले. साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला  समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. महिलांना अध्यक्षपदाचा मान  अधिकाधिक मिळाला तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल. राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहेते परस्पराला पूरक आहेत असेही श्री.पवार म्हणाले.

श्री.नहार म्हणालेदिल्लीतील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेखणी आणि ग्रंथालयाचे महत्व पोहोचविणारे आहे. पंतप्रधानांच्या हस्ते संमेलनाचे होणारे उद्घाटन राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राच्या सकारात्मक भूमिकेची पायाभरणी करणारे हे संमेलन आहे.

प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली.   मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शमिका अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधवविधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेमाजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेलोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर ,  विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0000000

व्यापा-यांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा - सहआयुक्त विनोद गवई

 

व्यापा-यांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा -  सहआयुक्त विनोद गवई

चंद्रपूरदि. 21 : देशात जीएसटी करप्रणाली लागु होऊन सात वर्ष झाली आहे. नवी योजना सुरू करण्यात काही अडचणी सुध्दा आल्यात. परंतु त्याचे निवारण टॅक्स प्रॅक्टिशनरव्यापारीउ‌द्योजकआणि विभागाच्या एकत्र प्रयत्नांनी सर्व अडचणींवर मात केली. करदात्यांना करभरणा करण्यास सुलभता यावी याकरिता शासनातर्फे जीएसटी अभय योजना-2024 राबविण्यात येत आहे.

वित्तीय वर्ष 2017-182018-192019-20 करिता जे प्रलंबित प्रकरणे आहेततसेच दि. 31 मार्च 2025 पर्यंत फक्त कराचा भरणा केल्यास त्यावर लागणारे व्याज व दंड माफ करण्यात आलेले आहे. सदर योजना ही व्यापाऱ्यांसाठी अतिशय लाभकारक असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वस्तू व सेवाकर विभागचंद्रपूर चे राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांनी केले.

वस्तू व सेवाकर विभागातर्फे श्री. गवई यांच्या अध्यक्षतेखाली अभय योजनेसंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सादरीकरणातून जीएसटी अभय योजना-2024 बाबत सविस्तर माहिती राज्यकर अधिकारी भारतभूषण डुमरे यांनी दिली. तसेच सदर योजना किती सुलभ व व्यापाऱ्यांच्या हिताची आहेहे पटवून दिले. 

यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांनी निराकरण केले. कार्यक्रमाचे संचालन राज्यकर अधिकारी भुषण शहाणे यांनी केले. कार्यक्रमाला सहायक राज्यकर आयुक्त तेजराम मडावी आणि राज्यकर अधिकारी गिरीश मडावी तसेच टॅक्स बार असोसीएशन तर्फे ॲड राहील साबीरॲ्ड. जनार्धन बदकीॲड. संजय चौबेॲड. विलास माथनकरॲड. अरुण भटारकरॲड. नितीन डोंगरे उपस्थित होते.

0000000

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्र पडताळणीसाठी संपर्क करण्याचे आवाहन

 

आरटीई  25 टक्के प्रवेश प्रक्रिया निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी

कागदपत्र पडताळणीसाठी संपर्क करण्याचे आवाहन

Ø प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत

चंद्रपूरदि. 21 : बालकांचा मोफत  व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत  वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्याकरिता 25 टक्के प्रवेश आरक्षणांतर्गत ऑनलाईन प्रवेश  प्रक्रिया चालू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवेश पात्र 185 शाळांमध्ये सदर प्रवेशासाठी राखीव असलेल्या 1527 जागांकरिता 4015 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून पहिल्या फेरीमध्ये प्रवेशाकरिता 1491 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पालकांना student.maharashtra.gov.in या  वेबसाईटवर अर्जाची स्थितीमुळ निवड यादी आणि प्रतिक्षा यादी पाहता येईल. ज्या विद्यार्थ्यांची निवड  झाली आहेत्या पालकांनी संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी कागदपत्रे पडताळणी करिता संपर्क साधावाअसे शिक्षण विभागाने कळविले आहे.

आरटीई  25 टक्के ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे  जाऊन पोर्टल संथ होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न कारावा. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत 14 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत राहील. निवड यादीतील प्रवेश  पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेतत्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात.

 तसेच आपल्याला  मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

आरटीई ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना  त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील. परंतु  पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाहीयाची खात्री करावी. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेतत्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहेयाची रिसीप्ट पडताळणी  समितीकडून घेणे आवश्यक आहे.  प्रतीक्षा यादीतील ‍विद्यार्थ्यानी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून  प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.

तरी पहिल्या फेरीत सदर प्रवेशाकरिता निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी सदरचे  प्रवेश विहित मुदतीत निश्चित करून घ्यावेअसे शिक्षण विभागाने कळविले आहे.

0000000

चंद्रपूर ग्रामीण भागातील 45619 घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मंजुरी पत्र

 


चंद्रपूर ग्रामीण भागातील 45619 घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मंजुरी पत्र

Ø 22 फेब्रुवारी रोजी दूरदृष्यप्रणालीद्वारे कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूरदि. 21 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास व पंचायतराज विभाग मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 22 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 चे महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांना दूरदृश्य पद्धतीने मंजुरी पत्र व पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्यातील 45619 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व 22114 घरकुल लाभार्थ्यांना पहिला टप्पा निधी वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि 22 फेब्रुवारी रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह,

चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह जिल्ह्यातील सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहणार आहे.

22 फेब्रुवारीला जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा होणार असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 चे महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरण करण्यात येणार आहे. व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्या जाणार आहे. तरी लाभार्थी आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

0000000

जिल्हाधिका-यांसोबत अन्य विभागांच्या बैठका आता फक्त बुधवार व गुरुवारीच

 

जिल्हाधिका-यांसोबत अन्य विभागांच्या बैठका आता फक्त बुधवार व गुरुवारीच

Ø राज्य शासनाच्या महसूल विभागाने निर्गमित केले परिपत्रक

चंद्रपूरदि 21 : राज्याचे मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री व मुख्य सचिव वगळताराज्य शासनाच्या अन्य विभागांना जिल्हाधिकारी यांच्यासमवेतआता फक्त बुधवार व गुरुवार या दोन दिवशीच बैठक आयोजित करता येणार आहे. मुख्यालयातून सदर बैठक शक्यतो व्हीसीद्वारेच आयोजित करण्यात यावी. तसेच महसुलेत्तर अत्यावश्यक विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यापूर्वी संबंधित विभागाने त्यासाठी महसूल विभागाची लेखी पूर्वपरवानगी घ्यावीअसे परिपत्रक राज्य शासनाच्या महसूल विभागाने निर्गमित केले आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या 19 मार्च 2016 च्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी यांना विभागप्रमुख म्हणून घोषित केले आहे. जिल्हाधिकारी हे महसूल विभागाच्या आकृतीबंधातील पद आहे. महसूल विभागाच्या कामकाजासोबतच इतर विभागांशी समन्वय व सनियंत्रणाची जबाबदारी पार पाडण्याची भूमिका जिल्हाधिका-यांना पार पाडावी लागते. गावतालुकाउपविभाग व जिल्हास्तरावरील महसूल व इतर विभागांच्या विविध योजनांची अंमलबजावणीसमन्वय व सनियंत्रणाची जबाबदारी जिल्हाधिका-यांवर असते. त्यामुळे ओघानेच जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाच्या विविध विभागांच्या बैठकांसाठीही व्यक्तीशः किंवा व्हीसीद्वारे उपस्थित राहावे लागते.

वेगवेगळ्या विभागांकडून आठवड्यातील बहुतांश दिवस जिल्हाधिकारी यांना बैठकांसाठी निमंत्रित केले जाते. बैठकांतील व्यस्ततेमुळे त्यांच्यावरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कामांना तसेच मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणीस विलंब होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या कामात सुसुत्रता / नियोजनबध्दता आणण्यासाठी व त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीला यथोचित न्याय देणे शक्य व्हावेयासाठी सदर सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

यात मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री व मुख्य सचिव वगळता राज्य शासनाच्या अन्य विभागांना जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजित करावयाची असल्यास फक्त बुधवार व गुरुवार या दोन दिवशीतसेच शक्यतो व्हीसीद्वारेच आयोजित करण्यात यावी. तसेचमहसूलेतर अत्यावश्यक विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यापूर्वी संबंधित विभागाने त्यासाठी महसूल विभागाची लेखी पूर्वपरवानगी घ्यावी.

तसेच अन्य विभागांनी बैठकीसाठी जिल्हाधिकारी यांना जिल्हा मुख्यालय सोडून अन्य ठिकाणी उदा. मंत्रालयविभागीय आयुक्त कार्यालयेयेथे बैठकीसाठी महसूल विभागाच्या परवानगीशिवाय व्यक्तीशः बोलावणे टाळावेअसेही परिपत्रकात नमुद आहे.

0000000