चंद्रपूर ग्रामीण भागातील 45619 घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मंजुरी पत्र
Ø 22 फेब्रुवारी रोजी दूरदृष्यप्रणालीद्वारे कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 21 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास व पंचायतराज विभाग मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 22 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 चे महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांना दूरदृश्य पद्धतीने मंजुरी पत्र व पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्यातील 45619 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व 22114 घरकुल लाभार्थ्यांना पहिला टप्पा निधी वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि 22 फेब्रुवारी रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह,
चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह जिल्ह्यातील सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहणार आहे.
22 फेब्रुवारीला जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा होणार असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 चे महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरण करण्यात येणार आहे. व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्या जाणार आहे. तरी लाभार्थी आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment