जिल्ह्यातील 25 शेतकरी जाणार बाहेर राज्यातील प्रशिक्षणाकरीता
Ø राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान
चंद्रपूर, दि.12 : जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान 2024-25
करीता राज्याबाहेरील प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी कृषी विभागाच्या वतीने उपलब्ध करून
देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाकरीता शेतकऱ्यांनी अर्ज
करावेत,
असे आवाहन जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना राष्ट्रीय
मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्याबाहेरील
प्रशिक्षणाकरीता हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात मधुमक्षिका पालनाला
असलेले महत्व लक्षात घेता मधमाशा वनस्पतीच्या परगीकरणात महत्वाची भूमिका बजावतात.
त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
मधाचे आयुर्वेदिक अनेक फायदे आहेत. उत्पन्न आणि
रोजगार निर्मिती,
शेतकरी आणि बिगर शेतकरी
कुटूंबाच्या चरितार्थाला हातभार, फलोत्पादनाच्या उत्पादनात वाढ आणणे, यासाठी
मधुमक्षिका पालन उद्योगात वाढ होण्यास मदत
होत. त्यामुळे मधुमक्षिकापालन काळाची गरज आहे.
सदर प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यास जे
शेतकरी/मधुमक्षिकापालक मधुमक्षिका पालनात स्वारस्य दाखवतील तसेच अनुसूचित जाती/
अनूसूचित जमाती आणि महिलांना प्रथम
प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षणाचा कालावधी 7 दिवसांचा राहील.
राज्याबाहेरील प्रशिक्षणासाठी लाभर्थ्यास इंग्रजी अथवा हिंदी भाषेचे ज्ञान असणे
गरजेचे आहे. ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लगणारा खर्च लाभार्थी शेतकऱ्यांना
स्वत: करावा लागेल. लाभार्थी शक्यतो 18 ते 65 वयोगटातील असावे.
प्रशिक्षणाकरीता शेतकऱ्यांनी 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत संबंधित तालूका कृषि अधिकारी यांच्याकडे सातबारा, 8 अ-, आधारकार्ड व छायाचित्रासह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शकंर तोटावार यांचे वतीने करण्यात आले
आहे.
०००००
No comments:
Post a Comment