Search This Blog

Thursday, 6 February 2025

तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 203 भाविक बौध्दगया येथे रवाना






 तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 203 भाविक बौध्दगया येथे रवाना

Ø सामाजिक न्याय विभागाचे आयोजन                                         

चंद्रपूरदि 06 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसारमुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत दि. 5 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बौध्दगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण 203 पात्र लाभार्थी महाबोधी मंदीर (बौद्धगया) येथे जाण्यासाठी बुधवारी रेल्वेने रवाना झाले.

या अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्यावतीने 5 फेब्रुवारी रोजी बौध्दगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील 203 भाविकांना घेऊन भारत गौरव पर्यटन रेल्वे, चंद्रपूर रेल्वे स्टेशनवरून सायंकाळी 5 वाजता रवाना झाली. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. तत्पुर्वी सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे, संवर्ग अधिकारी संगिता भांगरे आदींनी भाविकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नागपूर येथील समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सदर यात्रेचा शुभारंभ केला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्हीडीओद्वारे सर्व भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

दि. 7 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार आहे. 7 फेब्रुवारीला रात्री सदर रेल्वे बौद्धगया येथून परतणार असून 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता सदर ट्रेन चंद्रपूर येथे पोहोचणार आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाऊ शकत  नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे, यासाठी राज्यातील सर्वधर्मातील 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आता राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची /दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

०००००

No comments:

Post a Comment