अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करा
चंद्रपूर, दि.04 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय चंद्रपूर मार्फत थेट कर्ज योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील मांग/ मातंग व या समाजातील बारा पोट जातीतील लाभार्थ्यांकरीता 30 चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करावे. लाभार्थ्याशिवाय इतर व्यक्तीकडून अर्ज स्विकारण्यात येणार नाही. लाभार्थीचे निवड चिट्टी काढून लॉटरी पध्दतीने करण्यात येईल, याची लाभार्थींनी नोंद घ्यावी. कर्ज प्रकरण 1 लक्ष च्या मर्यादित मंजूर करण्यात येईल.
००००००
No comments:
Post a Comment