10 वी, 12 वीच्या खेळाडूंची ग्रेस गुण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने
चंद्रपूर, दि.12 : सन 2024-25 पासून इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी च्या खेळाडू
विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया केवळ ‘आपले सरकार प्रणाली’द्वारेच
करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडूंचे ग्रेस गुण
सर्व शाळांनी व मुख्याध्यापकांनी ऑनलाईन पध्दतीनेच महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे पाठवावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
यापुर्वी सन 2023-24 पर्यंत दरवर्षी जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील सर्व शाळांकडून 10 वी व 12 वीच्या खेळाडू
विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज मागवित होते, व अर्जाची तपासणी करून बोर्डाला त्यांचे
ग्रेस गुण कळवित होते. परंतु सन 2023-24 पर्यंतच्या ग्रेस गुण प्रक्रियेचे काम काही
मानवी उणीवांमुळे अचुक व दोषविरहीत होण्यात अडचण होत होती व त्याचा फटका खेळाडू
विद्यार्थ्यांना गुण न मिळाल्याने बसत
होता. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा व सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी या
वर्षीपासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया केवळ आपले सरकार पोर्टलद्वारेच
ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली आहे.
सर्व अर्ज आपले सरकार प्रणालीद्वारे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा
निर्माण करून देण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थी/ सर्व
माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी आपले सरकार ॲपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करावा. जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, चंद्रपूर
सदर अर्ज स्विकारणार नाही. खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्याच्या कामात
खेळाडूंचे नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांची राहील. त्यामुळे शाळांनी आपले सरकार या खेळाडूंसाठीच्या
ऑनलाईन प्रक्रियेची काटेकोरपणे अंमलबजावणी
करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी सर्व शाळा आणि खेळाडूंना
केले आहे.
००००००००
No comments:
Post a Comment