Search This Blog

Thursday, 13 February 2025

जिल्हाधिका-यांनी घेतला नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांचा आढावा



 जिल्हाधिका-यांनी घेतला नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांचा आढावा

            चंद्रपूर, दि. 13 : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथील नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांच्या समितीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये, सहायक धर्मादाय आयुक्त प्रियंका करवंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.  भास्कर सोनारकर, डॉ. किरण देशपांडे, वैद्यकीय क्षेत्रातील मंजुषा भगत, दीपमाला गायकवाड, भूपेंद्रकुमार उपासे, क्राइस्ट रुग्णालयाचे डॉ. जोसेफ, ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयाच्या एलिमाबेथ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेविषयी सामान्य जनतेला माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालय शासनाच्या पॅनलवर येण्यासाठी त्वरित प्रस्ताव पाठवावा. जेणेकरून उपचारासाठी निधी कमी पडणार नाही.

सहायक धर्मादाय आयुक्त प्रियंका करवंदे यांनी, धर्मादाय रुग्णालय योजनेचे लाभार्थी, त्यांचे निकष याबाबत माहिती दिली. रुग्णांवर उपचार करण्यासाठी निधी कमी पडतो तसेच रुग्ण दाखल करताना दस्तऐवजाबाबत येणाऱ्या अडचणीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. धर्मादाय रुग्णालयाबाबत एकही तक्रार प्रलंबित नसून, बेड नेहमी अपडेट केले जातात, तसेच 10 टक्के बेड राखीव ठेवले जातात, अशी माहिती श्रीमती करवंदे यांनी दिली.

०००००

No comments:

Post a Comment