Search This Blog

Tuesday, 11 February 2025

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करा

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करा

Ø अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2025

चंद्रपूर, दि.11 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2023-24  या वर्षासाठी देण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवार दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू- फुले- आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर पुरस्कार सन 2023-24 साठी देण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय  कार्य करणाऱ्या इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी रितसर अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण चंद्रपूर या कार्यालयात दिनांक 15 फेब्रुवारी 2025  पुर्वी अर्ज सादर करावे. अर्जाचा नमुना कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा. अधिक माहितीसाठी 07172 -253198 व कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment