तूर खरेदी : शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 28 : हंगाम 2024-25 मध्ये शासनाच्या पीएसएस योजनेअंतर्गत तूर खरेदीकरीता शेतकरी नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुार एनसीसीएफ मार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. त्यास आणखी 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून खालील दिलेल्या खरेदी केंद्रावर शेतक-यांनी नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांनी कळविले आहे.
असे आहेत नोंदणी केंद्र : 1. चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सह. संस्था मर्या. चंद्रपूर,खरेदी केंद्र- चिमुर 2.
कोरपना तालुका खरेदी विक्री- संस्था मर्या. कोरपना, खरेदी केंद्र- राजूरा, गडचांदुर 3. कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर, खरेदी केंद्र, चंद्रपूर 4. कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा खरेदी केंद्र, वरोरा
No comments:
Post a Comment