Search This Blog

Thursday, 13 February 2025

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

 

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने

अभिजात मराठीचा ऑनलाईन जागर’!

Ø व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 13 : दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

 या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?

आपण स्वतः कवीलेखककलाकारगायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही ( वाचन )आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचनगायनलोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंगपोवाडेनाट्यछटालघुकथागायन,  भारुड आदी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला.

आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील.

आपले व्हिडिओ इथे पाठवा : ईमेल: dgiprdlo@gmail.com या ईमेलवर अथवा

या व्हॉट्सअँप क्रमांकावर. 9892660933,  7504696786  किंवा 9325069713 (जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर)

महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. 98 वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावेचंद्रपूर जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक, कलाकार, गायक यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खालील समाजमाध्यमांवर उत्कृष्ट व्हिडिओ व कलाकृतीला प्रसिद्धी देण्यात येईल -

महासंवाद - https://mahasamvad.in/  

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR 

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr 

युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR

००००००

No comments:

Post a Comment