योजनांच्या सुलभतेसाठी महासैनिक पोर्टलवर नोंदणी अनिवार्य
चंद्रपूर, दि.14 : माजी सैनिक, माजी सैनिक विधवा आणि त्यांच्या अवलंबिताना महासैनिक पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 मार्च असून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महासैनिक पोर्टल mahasainik.maharashtra. gov.in वर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून सैनिक कल्याण विभाग आणि केंद्रीय सैनिक बोर्डाच्या योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. तसेच स्पर्श प्रणालीतील निवृत्ती वेतनविषयक माहिती तत्परतेने देण्यासाठी मदत होणार असल्याचे चंद्रपूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी सांगितले.
नोंदणीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, डिस्चार्ज बुक, पीपीओ, पेन्शन पासबुक, इ.सी.एच.एस कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक, ई-मेल, शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक आहेत. नोंदणी शुल्क 100 रुपये असून ते ऑनलाईन भरावे. कागदपत्रे पी.डी.एफ. स्वरुपात अपलोड करावीत. नोंदणी नंतर अर्जाची प्रिंट काढून मूळ पत्रासह पडताळणीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे भेट देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा.
००००००
No comments:
Post a Comment