Search This Blog

Tuesday, 18 February 2025

खाण बाधित क्षेत्रातील महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण




 खाण बाधित क्षेत्रातील महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण

Ø कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने बीआरटीसी चा उपक्रम

चंद्रपूर : खाणबाधित क्षेत्रातील कारागरांची कार्य कुशलता वाढविण्यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे (बीआरटीसी) निंबाळा येथे बांबू हस्तकला प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 15 दिवसांचा होता. खनिज विकास निधीच्या माध्यमातून महिलांना घरी राहून स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्याकरिता तसेच आर्थिक मिळकतीत सक्षम होण्याकरिता निंबाळा येथील महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले.

 या प्रशिक्षणदरम्यान बांबू पासून बनणाऱ्या विविध प्रकारच्या जाळी विणकाम त्यापासून बनणारे उत्पादन शिकवण्यात आले. प्रशिक्षण झाल्यावर टूल किट आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रशिक्षणाचे आयोजन बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक अशोक खडसेवनपरिक्षेत्र अधिकारी  ए. डी. मल्लेवार,  वनपाल सौदागर लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक प्रशिक्षण समन्वयक योगिता साठवणे तसेच हस्तकला निर्देशक  किशोर गायकवाडतांत्रिक सल्लागार अंतिक मलिक,  कांतीलाल गजभियेडिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजीचे प्रमुख या सर्व मान्यवरांच्या देखरेखीखाली tasech बांबू सखी  मनीषा शर्मा व अनिता भोयर या प्रशिक्षकांच्या उपस्थितीत पार पडले.

000000

No comments:

Post a Comment