पहिल्या "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्काराची घोषणा !

पहिल्या "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्काराची घोषणा !
पहिला "छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत" पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी... " या अमर प्रेरणा गीताला दिला जात आहे.
आमचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे हा पुरस्कार देत आहोत. कारण ते महानयोध्दे, कुशल प्रशासक, पराक्रमी तर होतेच तसेच ते कवी मानाचे आमचे राजे होते. म्हणून हा पुरस्कार त्यांच्या नावे देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी समुद्रात उडी मारली. सावरकर ६० यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे "अनादी मी ... अनंत मी.. हे गीत होय."
त्याच मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन या पुरस्काराची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे
-ॲड. आशिष शेलार
#ऐतिहासिक_निर्णय #छत्रपती_संभाजी_महाराज_महाराष्ट्र_प्रेरणा_गीत #अनादी_मी_अनंत_मी
No comments:
Post a Comment