Search This Blog

Monday, 10 February 2025

हिराई महोत्सवात डायग्नोस्टीक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिम


 

हिराई महोत्सवात डायग्नोस्टीक  कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिम

Ø आरोग्य विभागाचा उपक्रम

चंद्रपूरदि.१०:   जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणाउमेदमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती  अभियान व जिल्हा परिषदचंद्रपूर  यांच्या संयुक्त ‍विद्यमाने  महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत  चांदा क्लब ग्राउंड  येथे जिल्हास्तरीय हिराई महोत्सव  आयोजित करण्यात  आला होता. सदर महोत्सवात 

राष्ट्रीय  असंसर्गजन्य  रोग नियंत्रण कार्यक्रमजिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूरच्या वतीने  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. अशोक कटारे  यांच्या मार्गदर्शनात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारे स्तन कर्करोगगर्भाशय मुख कर्करोग  या आजाराकरिता डॉयग्नोस्टिक कॅन्सर व्हॅन च्या माध्यमातून स्तन कर्करोगगर्भाशयमूख कर्करोगमौखिक कर्करोग आरोग्य तपासणी  करण्यात आली.

स्त्रीरोग  तंज्ञाकडून स्तन कॅन्सर करिता एकूण १४१ clinical Brest Examination तपसणी तसेच गर्भाशय मुख कर्करोग करिता  संशयित महिलांची VIA तपासणी करण्यात आली. दंत शल्य चिकित्सक यांनी १८० महिलांची  मुख कर्करोग करिता  तपासणी केली.

सदर तपासणी शिबिराकरिता अति जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. भास्कर सोनारकर तसेच अति. जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. अविष्कार खंडारेडॉ. पद्माजा बोरकर,  चंद्रपूर आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

000000

No comments:

Post a Comment