Search This Blog

Sunday, 23 February 2025

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्य चंद्रपुर जिल्ह्याच्या दौ-यावर

 राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्य चंद्रपुर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूरदि. 23 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती सुनील शुक्रे आणि इतर दोन सदस्य तसेच कर्मचारी चंद्रपूर येथे मानाझाडेराजपुतआर्य वैश्य कोमटी व गोलकर या जात समुहाच्या मागण्यांच्या अनुषंगाने सुनावणीसाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुर्गापुर येथील थर्मल पॉवर स्टेशन विश्रामगृहात आगमन व मुक्काम.   दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यासोबत बैठकसकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मानाझाडेराजपुतआर्य वैश्य कोमटीगोलकर समाजप्रतिनिधींची सुनावणीदुपारी 1.30 वाजता राखीव. दुपारी 3 ते 5 या वेळेत थर्मल पॉवर स्टेशन विश्रामगृह येथे आयोगाची बैठक व मुक्काम. दि. 26 रोजी राखीव व सायंकाळी 7.30 वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे रवाना.

00000000

No comments:

Post a Comment