Search This Blog

Tuesday, 25 February 2025

निधी अप्राप्त असलेल्या शेतक-यांनी 28 फेब्र.पर्यत आधार संमती व ना - हरकत प्रमाणपत्र सादर करावे

 

निधी अप्राप्त असलेल्या शेतक-यांनी 28 फेब्र.पर्यत आधार संमती व ना - हरकत प्रमाणपत्र सादर करावे  

Ø कृषी विभागाचे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना आवाहन

चंद्रपूरदि. 25 : कृषी विभागाच्या सन 2023 च्या खरीप हंगामातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक    शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत निधी प्राप्त झाला नाही, अशा खातेदारांनी आधार संमती व ना - हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कृषी विभागाकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 5 हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येते. यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पीक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरीज्या शेतक-यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उता-यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, असे खातेदार वनपट्टेधारक खातेदार व जिवती तालुक्यातील संगणकीकरण नसलेल्या मधील खरीप 2023 कापूस/सोयाबीन उत्पादक वैयक्तीक व सामाईक खातेदार पात्र आहेत.

पात्र शेतक-यांनी ई-पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याबाबत www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहायक यांच्यकडून खातरजमा करून घ्यावी. तसेच ज्या शेतक-यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उता-यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहेअशा शेतक-यांनी व जिवती तालुक्यातील Non Digitalised Villages  मधील कापूस/सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांचेशी संपर्क साधावा. तसेच वनपट्टेधारक खातेदार यांनी तहसील/जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

तरी वर नमूद केल्याप्रमाणे अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधारसंमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र नमूना कृषि सहाय्यक यांचेकडे उपलब्ध आहे. विहीत मूदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागास प्राप्त न झाल्याने लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाहीयाची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी नजिकच्या उपविभागीय कृषि अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment