Search This Blog

Friday, 28 February 2025

जिल्ह्यात 5013 शालेय बालकांची आरोग्य तपासणी, मोफत उपचार

 जिल्ह्यात 5013 शालेय बालकांची आरोग्य तपासणीमोफत उपचार

Ø आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम

चंद्रपूरदि. 28 : आरोग्य विभागामार्फत राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडीतील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम  राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शाळा व अंगणवाडीमधील मुला-मुलींची  विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार असून जन्मजात आजार व इतर आजारांवर ‍विनामुल्य उपचारसंदर्भसेवा व विनामुल्य शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.

            कार्यक्रमाचे उद्घाटन दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते 1 मार्च 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता पुणे येथून करण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे- बोर्डीकर उपस्थित राहतील. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुक्यात दूरदृष्यप्रणाली द्वारे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांची  आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

या शाळांमध्ये होणार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी : 1. पी.एम.श्री सावित्रीबाई फुले प्रा.उच प्रा.शाळा, बाबूपेठ, चंद्रपूर (विद्यार्थी पटसंख्या -  850), 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदी न. प. शाळा, बल्लारपुर (विद्यार्थी पटसंख्या -  115), 3. जि.प.उ.प्रा.शाळाविजासन, भद्रावती (विद्यार्थी संख्या - 133), 4. एन.एच.गर्ल्स स्कुलब्रम्हपुरी (विद्यार्थी संख्या - 1275), 5.श्री. राष्ट्रीय प्रा.शाळाचिमुर (विद्यार्थी संख्या - 229),  6. जि.प. उ.प्रा. मुलांची शाळागोंडपिपरी (विद्यार्थी संख्या - 92), 7. जि.प. शाळाजिवती (विद्यार्थी संख्या – 298),  8. आदर्श हिंदी वि. गडचांदुर (विद्यार्थी संख्या - 263),  9. बालविकास विद्यालय, मुल (विद्यार्थी संख्या - 487), 10. सरस्वती ज्ञान मंदीरनागभिड (विद्यार्थी संख्या - 225), 11. जि.प.प्रा.शाळापोंभुर्णा (विद्यार्थी संख्या - 101), 12. आदर्श प्रा. विद्या मंदिरराजुरा (विद्यार्थी संख्या - 554), 13. जि.प.प्रा.शाळासावली क्रं. 1 (विद्यार्थी संख्या - 193), 14. जि.प.प्रा.शाळासिंदेवाही क्रं. 1 (विद्यार्थी संख्या - 133), 15. जि.प.प्रा.शाळावरोरा (विद्यार्थी संख्या - 65) असे एकूण 5013 विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

              राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम विशेष मोहिमेअंतर्गत जन्मत: व्यंगबालपणातील आजारजिवनसत्वची कमतरताविकासात्मक विलंब व किशोरावस्थतील आजार इ. आजाराची तपासणी करून मोफत उपचार करण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत ह्दयरोग शस्त्रक्रियाकॉकलेअर इंम्प्लॉटन्युरलटुब डिफेक्टहिप डिस्प्लेसिया,हायड्रोसेफॅलस,हर्निया हायड्रोसिलफायमोसिसअपेंडीक्सअनडिसेंडेडटेस्टीजहायपोस्पॅडीयातिरळेपणामोतीबिंदुदुभंलेले ओठ व टाळुक्लब फुट इ. आजारावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

       या मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच बालकांचे आरोग्य निरोगी करून त्यांचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment