Search This Blog

Thursday, 6 February 2025

‘कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी’ कार्यक्रम



 ‘कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी’ कार्यक्रम

            चंद्रपूर, दि. 6 : आम्ही आमच्या आरोग्यासाठीमिरॅकल फाऊंडेशन इंडियाजिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नियेाजन भवन येथे कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारीत पर्यायी काळजी हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा न्यायाधीश सुमीत जोशी होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला, आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार, संस्थापिका शुभदा देशमुख, नोडल अधिकारी निशिकांत रामटेके, बाल कल्याण समिती अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या मनिषा नखातेबाल न्याय मंडळाच्या भावना देशमुख, शासकीय बालगृह निरीक्षण गृह अधीक्षक श्री. सवई, दिवाकर महाकाळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुमीत जोशी म्हणाले, प्रत्येक बालकाला प्रेमळ कुटुंब मिळण्याची आजची गरज आहे. तसेच सृजन पालक कसा घडवायचा, याविषयी तसेच पोक्सो कायद्यातील बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक बालकाला एक प्रेमळ कुटुंब मिळावे, या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही आमच्या आरोग्यासाठी, मिरॅकल फाऊंडेशन इंडीया आणि महिला व बालविकास कार्यालयाद्वारे, काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे कुटुंब सक्षमीकरण करून कुटुंब आधारित पर्यायी संगोपनामध्ये बालकांना प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच गेटकिपींगद्वारे कार्य करीत आहेत.

या कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प व्यवस्थापक सैदूल टेकाम यांनी तर आभार मयुर राऊत यांनी मानले. यावेळी सर्व कर्मचारी, जिल्हा व रेल्वे चाइल्ड लाईनचे कर्मचारीआरोग्य विभागशिक्षण विभागबालगृह कर्मचारीबालकांच्या काळजी आणि संरक्षण क्षेत्रात व बाल संगोपन क्षेत्रात काम करीत असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment