Search This Blog

Friday, 28 February 2025

3 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 3 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

            चंद्रपूर, दि. 28 :  सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून ‘लोकशाही दिन’ जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येते. मार्च 2025 या  महिन्याचा पहिला सोमवार  3 मार्च  रोजी  येत असल्याने, या दिवशी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच 15 दिवस आधी 2 प्रतीत अर्ज सादर करावाव तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, तद्नंतरच  तक्रार अर्ज स्विकारण्यात येईल.

०००००

No comments:

Post a Comment