चंद्रपूर, दि.06 ऑक्टोंबर – चंद्रपूर जिल्हयातील छत्रपती शिवाजी महाराज महाकर्जमाफी अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाची सद्यास्थिती, बँकांमधील या संदर्भात सुरु असलेली कामे, चावडी वाचनाच्या कार्यक्रमाचा आढावा आदीबाबत आज राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आढावा घेतला.
आज दुपारी त्यांनी चंद्रपूर जिल्हयाच्या महाकर्जमाफी संदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हयातील विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अधिका-यांशी चर्चा करतांना त्यांनी ऑनलाईन अर्जाच्या संदर्भातील संपूर्ण डाटा तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे शक्य तेवढया लवकर शेतक-यांना दिलासा मिळेल, यासाठी यंत्रणा वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले. चंद्रपूर जिल्हयामध्ये कर्ज भरणा-या शेतक-यांची संख्या मोठया प्रमाणात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून मोठया संख्येत कर्जाची परतफेड करणा-यांना देखील योजनेतील तरतूदींचा लाभ मिळावा, असे निर्देश त्यांनी दिले.
यवतमाळ जिल्हयातील शेतकरी फवारणी करतांना विषबाधा होवून मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. कृषी विभागामार्फत या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. चंद्रपूर जिल्हयामध्ये अशा पध्दतीच्या घटना घडू नये, यासाठी कृषी व आरोग्य विभागाने लक्ष वेधावे असेही त्यांनी सांगितले.
ReplyDeleteकर्जमाफिच्या पहिल्या टप्प्यात कर्ज माफीचा फार्म भरून सुद्धा २५% कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.
सध्या २५००० कर्जमामाफीकरिता फार्म भरला आहे, परंतु शासनाच्या नविन धोरणाचा नुसार १,५०,००० रूपये कर्जमाफी करिता लाभार्थी होत असल्याने, भरलेला फार्म update करण्याचा प्रयत्न केला, परंतू हे होत नाही,तेव्हा १,५०,००० रूपये कर्जमाफीचा लाभ मिळविण्याकरिता काय करावं लागेल,
कृपया मार्गदर्शन करा