Search This Blog

Thursday, 31 October 2024

चिमूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी


 

चिमूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी

चंद्रपूरदि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 74- चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार चिमूर विधानसभा मतदारसंघात प्रथम खर्च लेखा तपासणी शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी बुधवार, दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे करण्यात येईल.

74 – चिमूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धर्मेंद सिंग हे वरील दिनांकास व वेळेस उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपाासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे चिमूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी कळविले आहे.

००००००

राजुरा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी


 

राजुरा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी

चंद्रपूरदि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 70- राजूरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार प्रथम खर्च लेखा तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी सोमवार दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, राजुरा येथे करण्यात येईल.

70 – राजुरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे वरील दिनांकास व वेळेस उपविभागीय कार्यालय सभागृह, राजूरा येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपाासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे राजुराचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र माने यांनी कळविले आहे.

००००००

पारदर्शक, खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात होईल निवडणुका





 

पारदर्शक, खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात होईल निवडणुका

Ø निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केला विश्वास

Ø नियोजन भवन येथे पूर्व तयारीचा आढावा

चंद्रपूरदि. 31 : भारत निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेऊन संबंधितांना सुचना केल्या. तसेच जिल्हा प्रशासनाची टीम उत्तम असून राजकीय पक्षांमध्येसुध्दा येथे सौहार्दाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शक पध्दतीने खुल्या, मुक्त आणि निर्भयपूर्ण वातावरणात होईल, असा विश्वास निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केला.

नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या बैठकीला सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार, आर. मुत्यालाराजु रेवुसंगिता सिंग, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक अवधेश पाठक, खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. आणि धमेंद्र सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका खुल्या आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे. दिव्यांग मतदारांचे मतदान आणि 85 वर्षांवरील नागरिकांच्या गृहमतदानावर विशेष लक्ष द्यावे. सर्व मतदान केंद्रात किमान मुलभूत सुविधा त्वरीत पूर्ण करा. नागरिकांमध्ये मतदान जनजागृतीकरीता महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत आदींनी स्वीप उपक्रम वाढवावे. बाजारपेठेत व इतर गर्दीच्या ठिकाणी मतदान जनजागृती करावी.

आंतरराज्यीय चेक पोस्टसह जिल्ह्यातील सर्व चेक पोस्टवर गांभिर्याने तपासणी करावी. दारू, रक्कम, ड्रग्ज, अवैध मार्गाने येणा-या वस्तुंची जप्ती करावी. सी-व्हिजीलवर येणा-या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. निवडणूकीच्या कामात असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या टपाली मतदानाची टक्केवारी वाढवावी. सोशल मिडीयावर विशेष लक्ष देऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक प्रक्रियेकरीता अधिकारी व कर्मचा-यांचे उत्तम प्रशिक्षण घ्यावे. जेणेकरून निवडणुकीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, अशा सुचना सामान्य निरीक्षक संजयकुमार यांनी दिल्या.

सामान्य निवडणूक निरीक्षक आर. मुत्यालाराजू रेवू म्हणाले, मतदार चिठ्ठी वाटप 100 टक्के करा. मतदारांना मतदानासाठी कोणतीही अडचण जावू नये. संगिता सिंग म्हणाल्या, मतदान केंद्रांची किरकोळ दुरुस्ती त्वरीत पूर्ण करारी. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प सुव्यवस्थित असावे. कायदा व सुव्यवस्था निरीक्षक अवधेश पाठक म्हणाले, स्ट्राँग रुमची सुरक्षा व्यवस्था सर्वोच्च असावी. चेकपोस्टसह सर्व नाके, रस्त्यांवर नाईट पेट्रोलिंग वाढवावी. खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. म्हणाले, वाहनांची परवानगी किती वेळेसाठी आहे, त्यानुसारच दर आकारण्याचे नियोजन करावे. धर्मेंद्र सिंह म्हणाले, विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च पथकामध्ये मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील निवडणूक विषयक पूर्वतयारीचे सादरीकरण केले. बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद : तत्पुर्वी निवडणूक निरीक्षकांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी वीस कलमी सभागृह येथे संवाद साधून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकीदरम्यान ज्या ठिकाणी गडबडीची शक्यता, पैसे, दारु पुरवठा आदी संशयास्पद बाबी आढळल्या तर लगेच जिल्हा प्रशासनाशी किंवा निवडणूक निरीक्षकांसोबत संपर्क साधावा,  अशा सुचना त्यांनी  केल्या.

००००००

Wednesday, 30 October 2024

सहा विधानसभा मतदारसंघात 120 उमेदवारांचे नामांकन वैध तर 30 जणांचे अवैध



 सहा विधानसभा मतदारसंघात 120 उमेदवारांचे नामांकन वैध तर 30 जणांचे अवैध

चंद्रपूरदि. 30 : नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी आज (दि. 30) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील 120 उमेदवारांचे नामांकन वैध तर 30 जणांचे नामांकन अवैध ठरले.

70 – राजूरा विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवारांचे अर्ज वैध तर 2 अवैध : वैध नामांकनामध्ये सुभाष रामचंद्र धोटेवामनराव सदाशिव चटपप्रिया बंडू खाडेनिनाद चंद्रशेखर बोरकरसंजय यादवराव धोटेचित्रलेखा कालिदास धंदरेसुदर्शन भगवानराव निमकरदेवराव विठोबा भोंगळेसचिन बापुराव भोयरगजानन गोदरु जुमनाकेप्रवीण रामराव कुमरेरेश्मा गणपत चव्हाणभुषण मधूकर फुसेप्रवीण रामदास सातपाडेमंगेश हिरामन गेडामकिरण गंगाधर गेडामअभय मारोती डोंगरे.

            अवैध नामांकनामध्ये अरुण रामचंद्र धोटे आणि वामन उध्दवजी आत्राम यांचा समावेश आाहे.

71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध तर 17 जणांचे अवैध : वैध नामांकनामध्ये सुरेश मल्हारी पाईकरावनभा संदीप वाघमारेराजेश भीमराव घुटकेकिशोर गजानन जोरगेवारप्रियदर्शन अजय इंगळेप्रवीण नानाजी पडवेकरमिलिंद प्रल्हाद दहिवलेज्ञानेश्वर एकनाथ नगराळेभानेश राजम मातंगीविनोद कवडूजी खोब्रागडेप्रकाश शंकर रामटेकेमनोज गोपीचंद लाडेप्रकाश उद्धवराव ताकसांडेब्रिजभूषण महादेव पाझारेराजू चिन्नय्या झोडेआनंद सुरेशराव इंगळेआणि रतन प्रल्हाद गायकवाड.

            अवैध नामांकनामध्ये भुवनेश्वर पद्माकर निमगडेकोमल किशोर जोरगेवारमोरेश्वर कोदूजी बडोलेविशाल शामराव रंगारीअरुण देविदास कांबळेबबन रामदास कासवटेआशिष अशोक माशीरकरस्नेहल देवानंद रामटेकेसंजय निळकंठ गावंडेज्ञानदेव भजन हुमणेदेवानंद नामदेवराव लांडगेभीमनवार संजय परशुरामराहुल अरुण घोटेकरप्रवर्तन देवराव आवळेमहेश मारोतराव मेंढेप्रतीक विठ्ठल डोरलीकरअशोक लक्ष्मणराव मस्के यांचा समावेश आहे.

72  बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांचे अर्ज वैधअवैध निरंक : वैध नामांकनामध्ये रावत संतोषसिंह चंदनसिंह (इंडियन नॅशनल काँग्रेस),किशोर बंडू उइके (अपक्ष)संजय निलकंठ गावंडे (अपक्ष)रामराव ओंकार चव्हाण (अपक्ष)निशा शितलकुमार धोंगडे (अपक्ष)राजु देविदास जांभुळे (अपक्ष)सतीश मुरलीधर मालेकर (वंचित बहुजन आघाडी)कुणाल पुरूषोत्‍तम गायकवाड (अपक्ष)सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार (भारतीय जनता पार्टी)अरूण देविदास कांबळे (रिपब्लीकन पार्टी इंडिया (रिफॉरमिस्ट)अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष),  प्रकाश मुरलीधर पाटील (अपक्ष)रब्बानी याकुब सय्यद (अपक्ष)उमेश राजेश्वर शेंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमाक्रेटीक)मनोज धर्मा आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी)संजय मारोतराव घाटे (अपक्ष),  सत्यपाल राघोजी कातकर (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए))गावतुरे छाया बंडू (अपक्ष)गावतुरे अनीता सुधाकर (अपक्ष)नरेन्द्र शंकर सोनारकर (बहुजन समाज पार्टी)सचिन राजबहुरण रावत (अपक्ष)राकेश नामदेवराव गावतुरे (अपक्ष)भारत सोमाजी थुलकर (ऑल इंडीयन रिपब्लीकन पार्टी)संजय शंकर कन्‍नावार (राष्ट्रीय समाज पक्ष)सैय्यद अफजल अली सैय्यद आबिद अली (अपक्ष)संदिप अनिल गिऱ्हे (अपक्ष) विरेंद्र भीमराव कांबळे (अपक्ष). अवैध नामांकनाची संख्या निरंक

73 - ब्रम्हपुरी मतदारसंघात 17 उमेदवारांचे अर्ज वैध तर 2 अवैध : वैध नामांकनामध्ये विजय वडेट्टीवार (इंडियन नॅशनल काँग्रेस)कृष्णालाल साहारे (भाजपा)केवळराम पारधी (बसपा)सुधीर टोंगे (राष्ट्रवादी समाज पार्टी)गोपाळ मेंढे (बीआरएसपी)विनोद नावघडे (अपक्ष)वसंत वर्जुरकर (अपक्ष)गुरुदेव भोपये (अपक्ष)सुधाकर श्रीराम (अपक्ष)अनंता भोयर  (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया)चक्रधर मेश्राम (जन जनवादी पक्ष)प्रशांत डांगे (आरपी रिपा)रमेश मडावी (अपक्ष)नारायण जमभुळे( स्वाभिमानी पक्ष)राहुल मेश्राम( वंचित बहुजन आघाडी)रमेश समर्थ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – ए)प्रेमलाळ मेश्राम (अपक्ष).

अवैध नामांकनामध्ये चक्रधर जांभुले (कृतीशील गणराज्य पक्ष) आणि पराग सहारे (अपक्ष).

74 – चिमूर मतदारसंघात 18 उमेदवारांचे अर्ज वैध तर 4 अवैध : वैध नामांकनामध्ये सतिश मनोहर वारजुकर (काँग्रेस)किर्तीकुमार मितेश भांगडीया (भाजपा)अरविंद आत्माराम सांदेकर (वंचित बहुजन आघाडी)डॉ. प्रकाश नक्कल नान्हे (पिझन्टस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया)निकेश प्रल्हाद रामटेके (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)अमित हरीदास भिमटे (आझाद समाज पार्टी)नारायण दिनबाजी जांभुळे (स्वाभीमानी पक्ष),  अरविंद आत्माराम सांदेकर (अपक्ष)अनिल अंबादास धोंगडे (अपक्ष)हेमंत गजानन दांडेकर (अपक्ष)धनराज रघुनाथ मुंगले (अपक्ष)कैलास श्रीहरी बोरकर (अपक्ष)योगेश नामदेवराव गोन्नाडे (अपक्ष)ॲङ हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष)मडावी मनोज उध्दवराव (अपक्ष)रमेश बाबुराव पचारे (अपक्ष)जितेंद्र मुरलीधर ठोंबरे (अपक्ष)केशव सिताराम रामटेके (अपक्ष).

अवैध नामांकनामध्ये धनराज रघुनाथ मुंगले (काँग्रेस)दांडेकर भाऊराव लक्ष्मण (काँग्रेस)राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके (बहुजन समाज पार्टी) आणि ॲङ हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष)

75 - वरोरा मतदारसंघात 24 उमेदवारांचे अर्ज वैध तर 5 अवैध : वैध नामांकनामध्ये प्रवीण सुरेश काकडे (इंडियन नॅशनल काँग्रेस)विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष)अमोल दिलीप बावणे (अपक्ष)राजू मारोती गायकवाड (अपक्ष)जयवंत नथुजी काकडे ( बीआरएसपी )जयंत मोरेश्वर  टेमुडे ( अपक्ष)अहेते श्याम सदाकत अली (प्रहार जनशक्ती)श्रीकृष्ण धुमदेव दडमल (अपक्ष)रंजना मनोहर पारशिवे (अपक्ष)करण संजय देवतळे  (भाजपा)मुकेश मनोज जीवतोडे (अपक्ष)चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष)महेश पंढरीनाथ ठेंगणे (अपक्ष),  मुनेश्वर बापूराव बदखल (अपक्ष)रमेश महादेवराव राजुरकर (अपक्ष)प्रवीण धोंडूजी सुर (मनसे)प्रवीण मनोहर खैरे (अपक्ष)नरेंद्र नानाजी जीवतोडे (अपक्ष)सुभाष जगन्नाथ ठेंगणे (अपक्ष)अतुल ईश्वर वानकर (अपक्ष),  अनिल नारायण धानोरकर (वंचित बहुजन आघाडी)सागर अनिल वरघणे (बहुजन समाज पक्ष)तारा महादेवराव काळे (अपक्ष)सेवकदास कवडूजी बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रेटिक) यांचा समावेश आहे.

            अवैध नामांकनामध्ये दिनेश दादाजी चोखारे (इंडियन नॅशनल काँग्रेस व अपक्ष)रमेश कवडुजी मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी व अपक्ष)नामदेव किसनाजी ढुमणे (अपक्ष)अंबर दौलत खानेकर (राष्ट्रीय समाज पक्ष) आणि सुमितकुमार नामदेव चंद्रागडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

0000000

निवडणूक निरीक्षकांची बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला भेट


 निवडणूक निरीक्षकांची बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला भेट

Ø स्ट्राँग रूमची पाहणी व निवडणूक विषयक बाबींचा आढावा

चंद्रपूर, दि. 30 : भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले सामान्य निवडणूक निरीक्षक संगीता सिंग, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक अवधेश पाठक आणि खर्च पथक निरीक्षक आदित्य बी. यांनी 72 – बल्लारपूर विधानसभा मतदासंघाला एकत्रित भेट देऊन निवडणूक व्यवस्थेचा आढावा घेतला.

तीनही निवडणूक निरीक्षकांनी अधिका-यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत 72- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित आणि नियमानुसार पार पाडण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय चरडेसहायक निवडणूक निर्णय अधिकारी मृदुला मोरेअभय गायकवाड यांनी आपल्या विभागाच्या तयारीचा अहवाल सादर केला.

यावेळी मतदार केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थामतदान यंत्रणांची सुरक्षिततामॉक पोल प्रक्रियामतदारांना सोयीसुविधानिवडणूक प्रचारावर लक्ष ठेवणेआणि निवडणूक खर्चाची तपासणी आदी मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली. तसेच निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नयेयासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेऊन त्याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कार्यात नियमांचे काटेकोर पालन करणे व मतदानाच्या दिवशी योग्य समन्वय साधून सुरक्षित आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावेअशा सुचनाही निवडणूक निरीक्षकांनी केल्या.

तत्पूर्वीतिनही निवडणूक निरीक्षकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील स्ट्राँग रुम परिसराची पाहणी केली. मतपत्रिका आणि इतर निवडणूकसामग्रीचे सुरक्षित संचयन होण्यासाठी स्ट्राँग रूचची सुरक्षितता महत्त्वाची आहेअसे निरीक्षकांनी स्पष्ट केले. यावेळी अवधेश पाठक यांनी तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. भगत आणि स्ट्राँग रुमचे व्यवस्थापन करणारे नोडल अधिकारी नंदकिशोर कुंभरे यांना याबाबत सर्वसमावेशक कार्यप्रणाली तयार करून तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

००००००

जिल्ह्यात कलम 37 लागू

 जिल्ह्यात कलम 37 लागू

चंद्रपूरदि. 30 : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.  तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व दिवाळी सणगुरुनानक जयंतीती असल्याने 1 नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात आले आहे.

सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खालील गोष्टींना मनाई करण्यात आली आहे.  

1. शस्त्रसोटेतलवारीभालेदंडेबंदूकासुरेकाठयालाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधणे बाळगणेजमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. जाहीरपणे घोषणा करणेगाणी म्हणनेवाद्ये वाजविणेज्यामुळे सभ्यता अगर नितीमता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणेहावभाव करणे ,अगर सोंग आणणे आणि अशी चित्रेचिन्हे फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे.

            2. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे लागू असेल ते) यांचे पूर्वपरवानगीशिवाय कोणीही सभामोर्चाउत्सव व मिरवणूक काढू नयेपाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेतसार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. हा आदेश संपूर्ण चंद्रपूर  जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागू राहतील.

          3. या आदेशाच्या प्रती उपविभागीय दंडाधिकारी, (सर्व) तालुका दंडाधिकारी (सर्व)संवर्ग विकास अधिकारी (सर्व) महानगरपालिका/नगर परिषद /नगर पंचायत/ ग्राम पंचायत (सर्व) पोलीस स्टेशन अधिकारी  (सर्व) यांचे नोटीस बोर्डावर लावून प्रसिध्द करावे. हा आदेश सहज दिसण्याजोग्या जागी लावावाहा आदेश कर्तव्यावरील शासकीय कर्मचारी यांना लागू होणार नाही. हे आदेश आज दिनांक 30 ऑक्टोबर 2024  रोजी जिल्हादंडाधिकारी यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.

००००००

जिल्ह्यासाठी सहा निवडणूक निरीक्षक निश्चित


 जिल्ह्यासाठी सहा निवडणूक निरीक्षक निश्चित

Ø तीन सामान्य निरीक्षक, दोन खर्च पथक तर एक कायदा व सुव्यवस्था निरीक्षक

चंद्रपूर, दि. 30 :  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक निश्चित झाले असून यात तीन सामान्य निरीक्षक, दोन खर्च पथक निरीक्षक तर एक कायदा व सुव्यवस्था निरीक्षक आहेत.

सामान्य निवडणूक निरीक्षक : 70 – राजूरा व 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी आर. मुत्यालाराजु रेवु (आय.ए.एस. आंध्र प्रदेश) निवडणूक निरीक्षक असून संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक 9405671147 आहे. निवडणूक कालावधीत त्यांच्या निवासाचा पत्ता ‘पांगारा’ कक्ष, वन अकादमी, मुल रोड चंद्रपूर येथे असून चंद्रपूर व राजुरा मतदारसंघातील नागरीक व राजकीय पदाधिका-यांसाठी ते दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत वन अकादमी येथील ‘पांगारा’ कक्षात उपलब्ध असतील.

72 – बल्लारपूर व 73 -ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून संगिता सिंग (आय.ए.एस. बिहार) असून संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक 9145768992 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता ‘शामली’ कक्ष, वन अकादमी, चंद्रपूर येथे असून नागरीक व राजकीय पदाधिका-यांसाठी त्या दररोज सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत वन अकादमी येथील ‘शामली’ येथे उपलब्ध असतील.

74 – चिमूर व 75 - वरोरा विधानसभा मतदारसंघाकरीता संजय कुमार (आय.ए.एस. उत्तर प्रदेश) असून संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक 9403473147 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता ‘पलाश’ कक्ष, वन अकादमी, चंद्रपूर येथे आहे. नागरिकांसाठी दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत ते वन अकादमी येथील ‘पलाश’ येथे उपलब्ध असतील.

खर्च पथक निरीक्षक : 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर आणि 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासाठी खर्च पथक निरीक्षक म्हणून आदित्य बी. (आय.आर.एस.) असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9422580147 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता खोली क्रमांक 203, पहिला माळा, रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर आहे. नागरिकांसाठी तसेच राजकीय पदाधिका-यांसाठी ते सकाळी 10 ते 12 या वेळेत रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे उपलब्ध असतील.

73 – ब्रम्हपुरी, 74 – चिमूर आणि 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघासाठी खर्च पथक निरीक्षक म्हणून धर्मेंद्र सिंह (आय.आर.एस.) असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9145767949 आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता खोली क्रमांक 201, पहिला माळा, रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर आहे. नागरिकांसाठी तसेच राजकीय पदाधिका-यांसाठी ते सकाळी 11 ते 12 या वेळेत रामबाग रेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे उपलब्ध असतील.

कायदा व सुव्यवस्था निरीक्षक : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक म्हणून अवधेश पाठक (आय.पी.एस.) असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9404063147 आहे. त्यांचा निवासाचा पत्ता ‘बकूल’ वन अकादमी, चंद्रपूर असून नागरिकांसाठी ते सकाळी 10 ते 11 या वेळेत उपलब्ध राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.

०००००

Tuesday, 29 October 2024

शेवटच्या दिवशी जिल्ह्यात 105उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल


 शेवटच्या दिवशी जिल्ह्यात 105 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

चंद्रपूर, दि. 29 :  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी (दि.29) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 105उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

70- राजुरा विधानसभा मतदारसंघात निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), रेशमा गणपत चव्हाण (जनवादी पार्टी), भूषण मधुकरराव फुसे (अपक्ष), प्रवीण रामदास सातपाडे (अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे ( भारतीय जनता पार्टी), मंगेश हिरामण गेडाम (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी), गजानन गोदरु जुमनाके (गोडवाना गणतंत्र पार्टी), अरुण रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), भूषण मधुकर फुसे  (संभाजी ब्रिगेड), किरण गंगाधर गेडाम (अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), अभय मारोती डोंगरे (बहुजन समाज पक्ष), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि वामन उद्धवजी आत्राम (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

71 - चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात विनोद कवडुजी खोब्रागडे (अपक्ष), प्रकाश शंकर रामटेके  (बहुजन मुक्ती पार्टी), प्रविण नानाजी पडवेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मनोज गोपीचंद लाडे (बहुजन समाज पक्ष), प्रकाश उध्दवराव ताकसांडे (अपक्ष), किशोर गजानन जोरगेवार (भारतीय जनता पार्टी), ब्रिजभुषण महादेव पाझारे (अपक्ष), कोमल किशोर जोरगेवार (अपक्ष), मोरेश्वर कोदुजी बडोले  (अपक्ष), राजु चिन्नया झोडे (अपक्ष), ॲङ विशाल शामराव रंगारी (बहुजन रिपब्लीक सोशालिस्ट पार्टी), अरुण देविदास कांबळे (रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिया (रिफारनिष्ठ), बबन रामदास कासवटे (अपक्ष), स्नेहल देवानंद रामटेके (वंचित बहुजन आघाडी), आशिष अशोक माशीरकर (अपक्ष), आनंद सुरेश इंगळे (अपक्ष), संजय निळकंठ गावंडे (अपक्ष), ज्ञानदेव भजन हुमणे  (अपक्ष), देवानंद नामदेवराव लांडगे (अपक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रतन प्रल्हाद गायकवाड (अपक्ष), प्रवर्तन देवराव आवळे (अपक्ष), भिमनवार संजय परशुराम (राष्ट्रीय समाज पक्ष), ॲड राहुल अरुण घोटेकर (अपक्ष), भावेश राजेश मातंगी (अपक्ष), महेश मारोतराव मेंढे (अपक्ष), प्रतिक विठल डोर्लीकर (ऑल इंडियन रिपब्लीक पार्टी), अशोक लक्ष्मणराव मस्के (अपक्ष)  यांचा समावेश आहे.

72- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात प्रकाश मुरलीधर पाटील (अपक्ष), रब्बानी याबुक सय्यद (अपक्ष), रावत संतोषसिंह चंदनसिंह (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), उमेश राजेश्वर शेंडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक), मनोज धर्मा आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी), संजय मारोतराव घाटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), सत्यपाल राधोजी कातकार (अपक्ष), गावतुरे छाया बंडू (अपक्ष), गावतुरे अनिता सुधाकर (अपक्ष), नरेंद्र शंकर सोनारकर (बहुजन समाज पार्टी), सचिन राजबहुरण रावत (अपक्ष), अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष), राकेश नामदेवराव गावतुरे (अपक्ष), भारत सोमाजी थूलकर (ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी), संजय शंकर कन्नावार (राष्ट्रीय समाज पक्ष), सय्यद अफजल अली सय्यद आबिद अली (अपक्ष), संदीप अनिल गि-हे (अपक्ष), विरेंद्र भीमराव कांबळे (अपक्ष).

73 - ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात चक्रधर पूनिराम मेश्राम (जन जनवादी पक्ष), चक्रधर दोनुजी जांभुळे (कृतीशील गणराज्य पार्टी), गुरुदेव डोपाजी भोपाये (अपक्ष), सुधाकर श्रीराम (अपक्ष), प्रशांत डांगे (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), केवलरम पारधी (बहुजन समाज पार्टी), गोपाळ मेंढे (बीआरएसपी), रमेश मडावी (बहुजन समाज पार्टी), नारायण जांभुळे (स्वाभिमानी पक्ष), राहुल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी), रमेश समर्थ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - ए), प्रेमलाल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी) आणि पराग साहरे (अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले.

74 - चिमूर विधानसभा मतदारसंघात योगेश नामदेवराव गोंनाडे  (अपक्ष), निकेश प्रल्हाद रामटेके (अपक्ष), अमित हरिदास भीमटे (अपक्ष), नारायणराव दिनबाजी जांभुळे (अपक्ष), हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष), राजेंद्र हरिचंद्र रामटेके (बहुजन समाज पार्टी), दांडेकर भाऊराव लक्ष्मण (अपक्ष), मडावी मनोज उद्धवराव, रमेश बाबुराव पचारे (अपक्ष), जितेंद्र मुरलीधर  ठोंबरे (अपक्ष), केशव सिताराम रामटेके (अपक्ष).

75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण धोंडोजी सुर (मनसे), जयवंत नथुजी काकडे      (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), प्रवीण मनोहर खैरे (अपक्ष), नरेंद्र नानाजी जीवतोडे (अपक्ष), सुभाष जगन्नाथ ठेंगणे (अपक्ष), दिनेश दादाजी चोखारे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), करण संजय देवतळे (भाजपा), अतुल ईश्वर वानकर (अपक्ष), अनिल नारायण धानोरकर (वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष),  चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), सागर अनिल वरघणे (बहुजन समाज पक्ष), महेश पंढरिनाथ ठेंगणे (अपक्ष), रमेश कवडूजी मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि अपक्ष), नामदेव किसनाजी ढुमणे (अपक्ष), मुकेश मनोजराव जीवतोडे (अपक्ष), अंबर दौलतराव खानेकर ( राष्ट्रीय समाज पक्ष),  सेवकदास कवडूजी बरके ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुमितकुमार नामदेव चंद्रागडे (अपक्ष), तारा महादेवराव काळे (अपक्ष) यांनी आज नामांकन अर्ज दाखल केले.

विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.

००००००

मतदार जनजागृती ऑनलाईन स्पर्धेत अंकिता शेंडे आणि सुरज मदनकर विजेते


 

मतदार जनजागृती ऑनलाईन स्पर्धेत अंकिता शेंडे आणि सुरज मदनकर विजेते

Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते धनादेश वितरण

चंद्रपूर, दि. 29 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरजिल्ह्यातील नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने "SVEEP" (Systematic Voters’ Education and Electoral Participation) उपक्रमांतर्गत विविध साप्ताहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश 18 वर्षांवरील पात्र मतदारांची नोंदणी करणेअधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे व मतदान प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. या अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये 4 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन अंकिता देविदास शेंडे तर टॅगलाईन (आपल्या विकासात देऊ या योगदान...चला सर्वांनी करू या मतदान) स्पर्धेत सुरज शंकर मदनकर विजेते ठरले आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते अंकिता शेंडे यांना 5 हजार व सुरज मदनकर यांना 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू उपस्थित होत्या.

एकूण पाच आठवड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने सदर उपक्रम राबविला असून यात सोमवार ते शनिवार इच्छुक नागरिक सहभागी होऊ शकतील आणि प्रत्येक रविवारी त्या आठवड्याचे निकाल जाहीर करण्यात येतील. याअंतर्गत 23 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्रत्येक आठवड्यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ज्यात गुगल फॉर्मद्वारे क्विझनिबंध लेखन स्पर्धाआणि मतदान प्रक्रियेवर आधारित व्हिडिओ तयार करण्याचे कार्यक्रम आहेत. सहभागी नागरिकांना लकी ड्रॉ द्वारे रोख व रोमांचक बक्षिसे दिले जातील.

जिल्हा निवडणूक कार्यालयद्वारे बनवण्यात आलेल्या पुस्तिकाच्या आधारावर ही स्पर्धा घेण्यात येत आहे. उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांनीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या वेबसाइटवर संबंधित साप्ताहिक स्पर्धांची माहिती व गुगल फॉर्म लिंक उपलब्ध आहे.

०००००००

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी पुढाकार घ्यावा


 

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी पुढाकार घ्यावा

Ø मतदान जनजागृती उपक्रमाचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 29 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात येथील नागरिक औद्योगिक आस्थापनांमध्ये नोकरी करीत असून बहुतांश निवासस्थानेसुध्दा औद्योगिक परिसरात आहे. याव्यतिरिक्त आपापल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांना मतदानाबाबत प्रवृत्त करणे, त्यांना मतदानाचे महत्व पटवून देणे, ही प्रशासनासोबतच औद्योगिक आस्थापनांचीसुध्दा सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या सामाजिक दायित्व निधीतून विविध उपक्रम राबविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

मतदान जनजागृती अंतर्गत ‘स्वीप’ उपक्रम तसेच थिमॅटीक मतदान केंद्राच्या तयारीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महाराष्ट्रात एकाच दिवशी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. सर्व औद्योगिक आस्थापनांनी आपल्या कपंनीमध्ये कार्यरत कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. आपात्कालीन परिस्थिती असेल तर तसे प्रशासनाला अवगत करून मतदानासाठी अर्ध्या दिवसाची सूट द्यावी. या आदेशाचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा औद्योगिक आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल.

व्होटर इर्न्फॉमेशन स्लीप (मतदार माहिती चिठ्ठी) वाटपासाठी आपापल्या क्षेत्रातील बीएलओ यांच्याशी समन्वय ठेवण्यासाठी उद्योगांनी एक नोडल अधिकारी नेमावा. जेणेकरून लोकांना कुठे मतदान करावयाचे आहे, याची माहिती मिळणे सोयीचे होईल. लोकसभेमध्ये जिल्ह्यातील उद्योगांनी ‘थिमॅटीक पोलिंग स्टेशन’ तयार केले होते. आताही मतदानाच्या दिवसापूर्वी आकर्षक थिमॅटीक पोलिंग स्टेशन पूर्ण तयार होईल, याबाबत योग्य नियोजन करावे. त्यासाठी नोडल अधिका-यांची नियुक्त करावी.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात मतदार जनजागृतीबाबत विद्यार्थ्यांमार्फत रॅली, पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, मतदानाचे महत्व अधोरेखीत करण्यासंदर्भात निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धा तसेच ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे. असेच उपक्रम औद्योगिक आस्थापनांनीसुध्दा राबवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केल्या.

बैठकीला चंद्रपूर फेरो अलाय, दालमिया सिमेंट, वेकोली (चंद्रपूर, वणी, माजरी), चमन मेटॅलिक, सिध्दबल्ली, बिल्ट बल्लारपूर, ग्रेस इंडस्ट्रिज, अंबूजा सिमेंट, पॉवर ग्रीड, माणिकगड सिमेंट, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, लॉयड्स मेटल्स, गोपानी इंडस्ट्रिज, धारीवाल यांच्यासह एकूण 20 औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

क्षेत्रीय अधिकारी, एसएसटी व एफएसटी प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिका-यांचे अधिकार

 क्षेत्रीय अधिकारी, एसएसटी व एफएसटी प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिका-यांचे अधिकार

Ø महाराष्ट्र राजपत्रात अधिसुचना प्रसिध्द

चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक – 2024 करीता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिका-यांना तसेच स्थायी निगराणी पथक (एसएसटी) आणि फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिका-यांचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतची अधिसुचना महाराष्ट्र राजपत्रात प्रकाशित झाली आहे.

निवडणूक प्रक्रियेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिका-यांना 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तर स्थायी निगराणी पथक (एसएसटी) आणि फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) प्रमुखांना 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच उपरोक्त अधिका-यांना आणि पथक प्रमुखांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – 2023 च्या कलम 148, 152, 162 आणि 163 अन्वये शक्ती प्रदान करण्यात आल्याचे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी कळविले आहे.

०००००००

चंद्रपूर व राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून आर. मुत्यालाराजू रेवू

 


चंद्रपूर व राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून आर. मुत्यालाराजू रेवू

Ø वन अकादमी येथे सकाळी 11 ते 12 या वेळेत नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध

चंद्रपूर, दि. 29 : जिल्ह्यातील 70- राजुरा विधानसभा मतदारसंघ व 71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता निवडणुक निरीक्षक म्हणून आरमुत्यालाराजु रेवु Shri. R. Mutyalaraju Revuयांची भारत निवडणुक आयोगाने नियुक्ती केली आहेते 2007 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (I.A.S.अधिकारी आहेत.

निवडणूक कालावधीत त्यांच्या निवासाचा पत्ता ‘पांगारा’ कक्ष, वन अकादमी, मुल रोडचंद्रपुर येथे असून त्यांच्या संपर्कासाठी 9405671147 हा मोबाईल क्रमांक आहेतसेच चंद्रपूर व राजुरा मतदारसंघातील नागरीक व राजकीय पदाधिका-यांसाठी ते दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत वन अकादमी येथील ‘पांगारा’ कक्षात उपलब्ध असतील, असे चंद्रपूर आणि राजुराचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

Monday, 28 October 2024

जिल्ह्यात सोमवारी 57 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

 

जिल्ह्यात सोमवारी 57 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

चंद्रपूर, दि. 28 :  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीसाठी सोमवारी (दि.28) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 57 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

70- राजुरा विधानसभा मतदारसंघात प्रिया बंडू खाडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), संजय यादवराव धोटे (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), सुदर्शन भगवान निमकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे  (भारतीय जनता पार्टी), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), गजानन गोदरू पाटील जुमनाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी),  प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी) आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

71 - चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्हारी पाईकराव (अपक्ष), राजेश भीमराव घुटके (अपक्ष), जोरगेवार किशोर गजानन (भारतीय जनता पार्टी), प्रियदर्शन अजय इंगळे (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व अपक्ष), प्रवीण नानाजी पडवेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मिलिंद प्रल्हाद दहिवले (केंद्रीय मानवाधिकार संगठन व  अपक्ष), ज्ञानेश्वर एकनाथ नगराळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-अ), भानेश राजम मातंगी (अपक्ष) आणि                     भुवनेश्वर पद्माकर निमगडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

72- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात किशोर बंडू उईके (अपक्ष), संजय नीलकंठ गावंडे  (अपक्ष), रामराव ओंकार चव्हाण (अपक्ष), निशा शीतलकुमार धोंगडे (अपक्ष), राजू देवीदास जांभुळे (अपक्ष), सतीश मुरलीधर मालेकर (वंचित बहुजन आघाडी), कुणाल पुरुषोत्तम गायकवाड (अपक्ष), सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार (भरतीय जनता पार्टी), अरुण देवीदास कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिर्फॉमिस्ट) आणि अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

73 - ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात विनोद अंबादास नवघडे (अपक्ष), कृष्णा सहारे (भारतीय जनता पार्टी), वसंत वर्जूर्कर (अपक्ष), अनंता भोयर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक).

74 - चिमूर विधानसभा मतदारसंघात अरविंद आत्माराम चांदेकर (वंचित बहुजन आघाडी), अनिल अंबादास घोंगळे (अपक्ष), सतीश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), हेमंत गजानन दांडेकर (अपक्ष), धनंजय मुंगले (अपक्ष), कैलास श्रीहरी बोरकर (अपक्ष), प्रकाश नान्हे (अपक्ष), डॉ. हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष).

75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष), अमोल दिलीप बावणे (अपक्ष), राजू मारोती गायकवाड. (अपक्ष), जयवंत नथ्थुजी  काकडे (अपक्ष), जयंत मोरेश्वर टेमुर्डे (अपक्ष), अहेतेशाम सदाकत अली (प्रहार जनशक्ती), श्रीकृष्ण धुमदेव दडमल (अपक्ष), रंजना मनोहर पारशिवे (अपक्ष), करण संजय देवतळे (भारतीय जनता पार्टी), मुकेश मनोज जिवतोडे (शिवसेना उबाठा आणि अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), महेश पंढरीनाथ ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बापूराव बदखल (अपक्ष), रमेश महादेवराव राजुरकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले.

 महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.

००००००