Search This Blog

Tuesday, 1 October 2024

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी साधला विविध घटकांशी संवाद


 






राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी साधला विविध घटकांशी संवाद

 

Ø शासकीय विभाग प्रमुखांची बैठक

चंद्रपूर दि. 1 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. 1) वन अकादमी येथे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकरवन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डीमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनमनपा आयुक्त विपिन पालीवालनिवासी उपजिल्हाधिकारी संजय पवारउपविभागीय अधिकारी संजय पवारसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणेमहावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडेप्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणालेजिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. जिल्ह्यात एकच एकलव्य निवासी स्कूल आहे. त्यामुळे आणखी एका एकलव्य शाळेची निर्मिती करावी. वनहक्क पट्टे वाटपाचे काम जिल्ह्यात अतिशय चांगले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू असल्यामुळे बांबूच्या उत्पादनांना चालना द्यावी. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा द्याव्यात. तसेच मनरेगाच्या माध्यमातून जिल्हा आदर्श करण्यावर प्रशासनाने भर द्यावा.

पुढे ते म्हणालेमानव - वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. पोलिस विभागाने पोक्सो कायदालैंगिक शोषणाबाबत जनजागृतीतसेच गुड टच बाद बॅड टच आदींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. यावेळी त्यांनी जिल्ह्यात शासकीय व खाजगी विद्युत प्रकल्प कितीते पूर्ण क्षमतेने चालतात कायशाळाअंगणवाड्यांची स्थितीप्रधानमंत्री आवास योजनेबाबत माहिती तसेच विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्याची भौगोलिकसांस्कृतिकशैक्षणिकऔद्योगिक व इतर माहिती सादर करतांना जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी योजनाजिल्ह्यात असलेले उद्योगकृषी संदर्भातील माहितीपर्यटनसुरू असलेले प्रकल्प याबाबत राज्यपालांना अवगत केले. यात जलजीवन मिशनशाळा अंगणवाड्यांची स्थितीआयुष्यमान भारतप्रधानमंत्री ग्रामसडक योजनाप्रधानमंत्री किसान सन्मान निधीस्वामित्व योजनाकिसान क्रेडिट कार्डअटल पेन्शन योजनाप्रधानमंत्री आवास योजनामनरेगावन हक्क पट्टे सोबतच जिल्ह्यात सुरू असलेले मोठे प्रकल्प कॅन्सर केअर हॉस्पिटलनवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतबॉटनिकल गार्डनबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रएस. एन. डी. टी. विद्यापीठचंद्रपूर फ्लाईंग क्लब आदींबाबत राज्यपालांना अवगत केले.

विविध नामवंत व्यक्तीसोबत संवाद : राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी जिल्ह्यातील उद्योग प्रतिनिधीसमाजसेवकसाहित्यिककलाकारपर्यावरण तज्ञशासकीय व खाजगी महाविद्यालयाचे प्राचार्यक्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूप्रगतिशील आदिवासी शेतकरीपत्रकार यांच्याशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासमोर प्रामुख्याने जिल्ह्यात सुरू असलेली आणि भविष्यात आवश्यक असलेली विकास कामेउद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकासउद्योगांच्या समस्यापर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास यासारखे विषय मांडण्यात आले.

यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनतसेच उद्योगांमध्ये प्रत्यक्षात कशा प्रकारची रोजगार निर्मिती आवश्यक आहेत्याची माहिती जाणून घेतली. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल विद्यार्थी पालकांमध्ये जनजागृती करावीजिल्ह्यातील खेळाडूंसाठी विशेष क्रीडा डॉक्टरची नियुक्ती करावी,  खेळाडूंना उत्कृष्ट पोषणआहारप्रोटीन युक्त पदार्थ योजनेच्या माध्यमातून देण्याची तरतूद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या.

यावेळी त्यांनी राजकीय पक्षांचे प्रमुख नेतेलोकप्रतिनिधी यांच्याशी सुद्धा चर्चा केली.

0000000

No comments:

Post a Comment