Search This Blog

Thursday, 10 October 2024

पुनर्वसीत रानतळोधी गावाला महसुली गावाचा दर्जा

 

पुनर्वसीत रानतळोधी गावाला महसुली गावाचा दर्जा

Ø 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत हरकती व सुचना स्वीकारण्यात येतील

चंद्रपूरदि. 10 :  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 4 (1) अन्वये गावाला महसूली दर्जा देण्याचे अधिकार राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहे. या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भद्रावती तालुक्यातील रानतळोधी या गावाचे पुनर्वसन वरोरा तालुक्यात सालोरी / परसोडा येथील वनकक्ष क्रमांक 14 – ब क्षेत्र 374.75 हे.आर.मध्ये करून रानतळोधी या पुनर्वसीत गावाला महसुली दर्जा देण्याबाबत प्रारुप अधिसुचना प्रसिध्द केली आहे.

 या अनुषंगाने कोणास काही आक्षेप असल्यास त्यांचे लेखी आक्षेप / हरकती / सुचना 15 दिवसांच्या आत म्हणजे 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment