Search This Blog

Saturday, 26 October 2024

माजी सैनिकांच्या / विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

 

माजी सैनिकांच्या / विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

Ø 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

चंद्रपूर, दि. 26 : शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उर्त्तीण झालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांनी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

लाभार्थीचा अर्जशिष्यवृत्ती फॉर्मओळखपत्राची छायाकिंत प्रतबोनाफार्इड प्रमाणपत्रउर्त्तीण झालेल्या वर्गाची गुणपत्रिकेची झेरॉक्स व इतर कुठल्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे प्रमाणपत्र इत्यादि कागदपत्र अर्जासोबत जोडावेत. ज्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती  अंतर्गत शिष्यवृत्ती मिळवायची आहेअशा पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची शिष्यवृत्ती लागू होत नाही. ज्या पाल्यांनी सीईटीजेईई  किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्षासाठी  प्रवेश घेतलेला आहेअशा विद्यार्थ्यांनी प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट जोडावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयप्रशासकीय इमारतपहिला मजलारूम नंबर 3चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment