प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेकरीता 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 26 : जिल्ह्यातील माजी सैनिक /विधवांच्या पाल्यांनी वर्ग 12 वी मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी कोणत्याही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास सदर विद्यार्थी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र आहेत.
त्याकरिता ऑनलाईन अर्ज www.ksb.gov.in या वेबसाईटवर असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. तरी मुळ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे स्कॅन करुन प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासह अपलोड करावे. अपूर्ण किंवा चूकीचा अर्ज भरलेला असल्यास नाकारल्या जाईल. तरी सर्व संबंधित माजी सैनिक/ विधवांनी आपापल्या पात्र पाल्यांचे ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment