Search This Blog

Tuesday, 29 October 2024

चंद्रपूर व राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून आर. मुत्यालाराजू रेवू

 


चंद्रपूर व राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून आर. मुत्यालाराजू रेवू

Ø वन अकादमी येथे सकाळी 11 ते 12 या वेळेत नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध

चंद्रपूर, दि. 29 : जिल्ह्यातील 70- राजुरा विधानसभा मतदारसंघ व 71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता निवडणुक निरीक्षक म्हणून आर. मुत्यालाराजु रेवु ( Shri. R. Mutyalaraju Revu) यांची भारत निवडणुक आयोगाने नियुक्ती केली आहे. ते 2007 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (I.A.S.) अधिकारी आहेत.

निवडणूक कालावधीत त्यांच्या निवासाचा पत्ता ‘पांगारा’ कक्ष, वन अकादमी, मुल रोड, चंद्रपुर येथे असून त्यांच्या संपर्कासाठी 9405671147 हा मोबाईल क्रमांक आहे. तसेच चंद्रपूर व राजुरा मतदारसंघातील नागरीक व राजकीय पदाधिका-यांसाठी ते दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत वन अकादमी येथील ‘पांगारा’ कक्षात उपलब्ध असतील, असे चंद्रपूर आणि राजुराचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment