क्षेत्रीय अधिकारी, एसएसटी व एफएसटी प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिका-यांचे अधिकार
Ø महाराष्ट्र राजपत्रात अधिसुचना प्रसिध्द
चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक – 2024 करीता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिका-यांना तसेच स्थायी निगराणी पथक (एसएसटी) आणि फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिका-यांचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतची अधिसुचना महाराष्ट्र राजपत्रात प्रकाशित झाली आहे.
निवडणूक प्रक्रियेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिका-यांना 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तर स्थायी निगराणी पथक (एसएसटी) आणि फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) प्रमुखांना 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच उपरोक्त अधिका-यांना आणि पथक प्रमुखांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – 2023 च्या कलम 148, 152, 162 आणि 163 अन्वये शक्ती प्रदान करण्यात आल्याचे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment