Search This Blog

Saturday, 26 October 2024

खेलो इंडिया (मैदानी) प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड

 खेलो इंडिया (मैदानी) प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड

             चंद्रपूरदि. 26 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत नागपूर विभागस्तरीय 14, 17 व 19 वर्षाआतील मुले /मुलींच्या शालेय मैदानी  क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलचंद्रपूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत खेलो इंडिया (मैदानी) प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी विभागस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यामधुन क्रिष्णा रोहणेसोहम मोरेअंकित यादव दर्शन निवाडेआरुष चव्हाणयुकांत उकेश्रेया ईथापेकिंजल भगतअंकिता चव्हाण या खेळाडुंनी खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक  रोशन भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कष्ट प्रदर्शन करीत राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेला गवसनी घातली.

त्यांच्या या यशासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरेजयश्री देवकर, मनोज पंधराम, नंदु अवारे, मोरेश्वर गायकवाड, संदिप उईके, राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे तसेच ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वालसचिव सुरेश अडपेवार व इतर पदाधिका-यांनी खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडुंना भविष्यासाठी व राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

०००००

No comments:

Post a Comment