Search This Blog

Saturday, 26 October 2024

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

 अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर26 : दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8 च्या सुमारास माजरी वरोरा रेल्वे स्टेशन दरम्यान एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 55 ते 60 वर्ष  वयोगटातील रेल्वे गेटजवळ जवळ जखमी अवस्थेत पडले होते. रेल्वे कर्मचारी व रेल्वे पोलिसांनी त्यास उपचाराकरीता उपजिल्हा रुणालय वरोरा येथे नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी इसमावर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर सामान्य रुग्णालय येथे रेफर केले. येथील अपघात विभागात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. वैद्यकीयअधिकारी चंद्रपूर यांचे मेमोवरुन  चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला. सदर मृतकाची ओळख पटविण्यासाठी त्यांचे कुठे नातेवाईक असल्यास त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

मृतकाचे वर्णन : एक अनोळखी पुरुष अंदाजे वय 55 ते 60 वर्ष, बांधा सडपातळ,  डोक्याचे केस काळे पांढरेअंगात गुलाबी रंगाचा फुलबाहयाचा शर्ट, काळया रंगाचा पॅन्ट, आहे. सदर इसम कोणत्यातरी ट्रेन मधून प्रवास करतांना पडलेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

                                                          ०००००००

No comments:

Post a Comment