Search This Blog

Thursday, 8 October 2026

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी प्रस्ताव सादर करा


राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी प्रस्ताव सादर करा

Ø अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत

चंद्रपूर, दि. 08 : सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2026-27’ राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील विविध विभाग, पंचायत समित्या तसेच अधिनस्त कार्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या कार्यालयीन कामकाजातील नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय उपक्रमांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिंह केले आहे.

या अभियानाचा कृती कालावधी 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2026 असा असून अभियानांतर्गत विविध स्तरांवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती व प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. त्यासाठी 16 ऑक्टोबर 2026 पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 31 ऑक्टोबर  ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. यासाठी शासनाने ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा’ हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले असून, pragatiabhiyan.maharashtra.gov.in/Home/Index या संकेतस्थळावरून प्रस्ताव व आवश्यक माहिती ऑनलाइन सादर करता येईल.

अभियानाशी संबंधित प्रस्ताव निर्धारित मुदतीत ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. या अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाजात गतिमानता, कार्यक्षमता, पारदर्शकता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि लोकाभिमुख प्रशासनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कार्यालयांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून उत्कृष्ट उपक्रमांचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिंह केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment