Search This Blog

Tuesday, 3 November 2020

शेतकऱ्यांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा: जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे


 शेतकऱ्यांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा: जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे

Ø योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर दि. 3 नोव्हेंबर: शेतकऱ्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास येणाऱ्या अडचणीमुळे दिवसेंदिवस मुद्दल व त्यावर वाढणारे व्याज तसेच बँकेची दीर्घकाळापासूनची थकीत कर्ज विचारात घेता एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला दि.31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी भूविकास बँकेकडून या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाला 6 टक्के व्याज दराने व्याज आकारणी करण्यात येणार आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडून कर्जाची रक्कम वसूल करताना 1 एप्रिल 2004 नंतर बँकेने केलेले व्याजाचे मुद्दलीकरण रद्द करण्यात येणार असून सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांकडून 31 मार्च 2004 अखेर थकीत असलेल्या मुद्दल रकमेवर 6 टक्के व्याजदराने सरळ व्याजाने व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्हा भूविकास बँकेचे एकूण 129 कर्जदार सभासद असून त्यांच्याकडे सन 2020-21 या चालू वर्षात दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत व्याज अधिक मुद्दलासह रुपये 364.00 लक्ष बँकेच्या प्रचलित धोरणाप्रमाणे घेणे आहे. सर्व कर्जदार सभासदांनी दिलेल्या मुदतीत एकरकमी कर्ज परतफेड योजनेत कर्ज वसुलीचा भरणा केल्यास कर्जदार सभासदांना 287.19 लक्ष रुपयांची सवलत मिळू शकते.

एकरकमी कर्ज परतफेड योजनेत सहभागी न होणाऱ्या व दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत योजनेनुसार कर्जाची परतफेड न करणाऱ्या कर्जदार सभासदांच्या बाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार वसुलीची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या कर्जदार सभासदांनी बँकेच्या संजय गांधी मार्केट सिविल लाइन्स चंद्रपुर येथील कार्यालयातून योजनेची व आपल्या कर्जाच्या हिशेबाची माहिती घेऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत एकरकमी कर्ज परतफेड योजनेनुसार कर्जाच्या वसुलीचा भरणा करून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.

00000

नगरपरिषदेसाठी आरक्षण सोडत 10 नोव्हेंबरला

 

नगरपरिषदेसाठी आरक्षण सोडत 10 नोव्हेंबरला

चिमूरसावली व पोंभूर्णा येथील नागरिकांनी हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

चंद्रपूर दि.3 नोव्हेंबर :  चिमूर नगरपरिषद तसेच सावली व पोंभुर्णा येथील नगरपंचायतीचे आरक्षण सोडत  दि.10 नोव्हेंबर 2020 मंगळवार रोजी निश्चित करण्यात येणार आहे. यासंबंधाने जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली असून प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिलानागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला त्यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.

चिमूर नगर परिषदेसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळसावली नगरपंचायती साठी महादेव खेडकरपोभुर्णा नगरपंचायतीसाठी संजय कुमार डव्हळे यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 10 नोव्हेंबर 2020 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता सोडत पद्धतीने जागा निश्चित करण्यात येतील.

तरी आरक्षण सोडतीच्या वेळी संबंधित नगर परिषदनगरपंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Monday, 2 November 2020

जिल्ह्यात मागील 24 तासात नवीन कोरोना बाधितांच्या संख्येत घट


 जिल्ह्यात मागील 24 तासात नवीन कोरोना बाधितांच्या संख्येत घट

24 तासात केवळ 53 नव्याने पॉझिटिव्ह; 202 बाधित झाले बरे

Ø दोन बाधितांचा मृत्यू

Ø आतापर्यंत 13001 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2753

चंद्रपूरदि. 2 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 202 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून केवळ 53 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील 60 वर्षीय पुरुष व चिमूर तालुक्यातील नेरी येथील 70 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 236 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 221, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सहायवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 53 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 15 हजार 990 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 202 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार एक झाली आहे. सध्या 2 हजार 753 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 21 हजार 98 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 3 हजार 848 नमुने निगेटीव्ह आले आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 53 बाधितांमध्ये 26 पुरुष व 27 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 33, पोंभुर्णा तालुक्यातील एकबल्लारपूर तालुक्यातील दोन,   कोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील आठ,  वरोरा तालुक्यातील एक,भद्रावती तालुक्यातील एकराजुरा तालुक्यातील दोननागभीड तालुक्यातील एक तर गडचिरोली येथील तीन असे एकूण 53 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील पठाणपुरा वार्डएकोरी वार्डलालपेठदुर्गापुरनगीना बागराजा नगर कॉलनी परिसरअंचलेश्वर वॉर्डजगन्नाथ बाबा नगरइंदिरानगरजलनगरनानाजी नगरभटाळी कॉलनी परिसरम्हाडा कॉलनीराजीव गांधी नगरघुग्घुसचिचपल्लीबाबुपेठऊर्जानगर भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडीमालडोंगरीसम्राट अशोक चौक परिसरतळोधी परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील कापरे लेआउट परीसरसमता नगरपरिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील  जनकापूर भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील ज्योती नगर गडचांदूर भागातून बाधित ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील कसरगट्टा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

00000

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज इमारतीत कार्यान्वित करणार : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 





जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज इमारतीत कार्यान्वित करणार : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

निलसनी पेठगाव येथील समाज भवनाचे लोकार्पण

चंद्रपूर,दि.2 नोव्हेंबर:  जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी विविध निधीतून तब्बल 85 कोटी खेचून आणून जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यात येत आहे. जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून पुढील दोन  वर्षात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीत सुसज्य व्यवस्थेसह कार्यान्वित होतीलयादृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले.

सावली तालुक्यातील व्याहाड आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा  संध्याताई गुरनुले उपस्थित होत्या. तर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व आरोग्य व शिक्षण विभागाच्या सभापती रेखा कारेकारसभापती विजय कोरेवारसदस्य संतोष तंगडपल्लीवार, योगिता डवलेउपसभापती रवींद्र बोलीवारजिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोतखनिज प्रतिष्ठानचे सदस्य दिनेश पाटील चिकनुरवारगटविकास अधिकारी संजय वानखेडेतालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावीमाजी सरपंच शालिनी पाटील म्हशाखेत्रीनिखिल गावंडे  प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले कीकोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांकरिता कठीण प्रसंगी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून 38 रुग्णवाहिका घेण्यात आल्यात. सोबतच विविध विकास कामांना देखील मंजुरी देण्यात येत आहे. वर्षातून दोन वेळा पीक घेता यावे म्हणून सिंचनामध्ये जिल्हा स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात  येत आहे.  व्याहाड गावातील सार्वजनिक सभागृहासाठी 30 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून काम सुरू झाल्यावर अधिक निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  एकोरी माता देवीच्या तीर्थक्षेत्र  विकास कामांसाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी प्रमाणे या वर्षी 700 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकरी सुखी व्हावा म्हणून या क्षेत्रात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात भर देण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी यावेळी निलसनी पेठगाव येथील समाज भवनाचे देखील लोकार्पण केले.

कोरोना अजून संपला नाहीपण थोडासा कमी झाला आहे. तुम्ही काळजी घेतली नाही तर तो पुन्हा वाढणार आहे. आपल्याकडे देखील कोरोनाची वाढ थांबून त्यावर नियंत्रण मिळाले आहे. दिवाळीत खरेदीसाठी बाजारात जातांना  दक्षता घ्यावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही भूमिका निभावून कोरोनापासुन सर्व कुटुंबियांना वाचवावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची संपत्ती असून त्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी एकोरी माता देवस्थान दुरुस्ती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थानाचे बांधकाम करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली.

 

यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश बांगडे यांनी नवीन आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी 3 कोटी 99 लाख रुपये मंजुरी मिळाली होतीअसे सांगून केवळ 9 महिन्यात आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण केले असल्याचे सांगितले. या इमारतीत पुरुष व स्त्रियांसाठी वेगवेगळे तपासणी कक्षऑपरेशन थिएटर,  शवविच्छेदन गृह,  इत्यादी अद्यावत सोई सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमात जि.प. सदस्य संतोष तंगडपल्लीवारविजय कोरेवाररेखा कारेकार यांनी देखील आपले मत व्यक्त केले. कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या श्रीमती वानखेडेज्ञानेश्वरी चौधरीपूजा भारसाकडेसंगीता तुकडे, सुनंदा तुकडे या आरोग्य कर्मचारीआशा स्वयंसेविकाअंगणवाडी सेविकांचा मान्यवरांच्या हस्ते आरोग्य-किट देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी आरोग्यमहसूल व जिल्हा परिषदेतील संबंधित यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

00000

Sunday, 1 November 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 12799 बाधित झाले बरे

 

जिल्ह्यात आतापर्यंत 12799 बाधित झाले बरे

गेल्या 24 तासात 165 नव्याने बाधित दोन बाधितांचा मृत्यू

Ø  उपचार घेत असलेले बाधित 2904

Ø  जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 15937

चंद्रपूरदि. 1 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे दोन बाधितांचा मृत्यू झाला असून 165 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 937 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  129 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 799 झाली आहे.  सध्या 2 हजार 904 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 20 हजार 924  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 3 हजार 640 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यु झालेल्या बाधितांमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा येथील 62 वर्षीय पुरुष व चिमूर शहरातील गांधी वार्ड येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 234 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 219, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सहायवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 92 पुरूष व 73 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 56 बाधितपोंभुर्णा तालुक्यातील एकबल्लारपूर तालुक्यातील एकचिमूर तालुक्यातील 9, मुल तालुक्यातील 10, गोंडपिपरी तालुक्यातील चारकोरपना तालुक्यातील 12, ब्रह्मपुरी तालुक्यातील सातनागभीड तालुक्यातील 18,  वरोरा तालुक्यातील सहाभद्रावती तालुक्यातील 22, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील सहाराजुरा तालुक्यातील सहा तर गडचिरोली येथील  सहा असे एकूण 165 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील घुटकाळा वार्डकृष्णनगरइंदिरानगरतुकुमदत्तनगरवडगावरामनगरसिव्हिल लाईनबालाजी वार्डबाबुपेठऊर्जानगरबापट नगरआयुष नगरशास्त्रीनगरघुग्घुसभानापेठ वार्डमहाकाली वार्डजीएमसी परिसरबंगाली कॅम्पगौतम नगर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

तालुक्यातून या ठिकाणी आढळले बाधित:

कोरपना तालुक्यातील काडोलीगडचांदूर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर एकवार्ड नंबर 10, वार्ड नंबर 11, वार्ड नंबर 14, राजगड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी,विहीरगांव भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगावकाचेपारनांदगाव परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील तलोढीमुसाभाई नगरसोनुर्लीकिटाळीबाळापुर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगरसंत रविदास चौकगुजरी वार्डविद्यानगर परिसरातून बाधित ठरले आहे.


वरोरा तालुक्यातील टेमुर्डाअभ्यंकर वार्डआनंदवन परीसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील पिपरबोडीसुर्या मंदिर वार्डलक्ष्मी नगरपंचशिल नगर, सुमठाणा, सुरक्षा नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील विवेकानंद वार्ड भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तलोढीपंचशिल वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील भरपायली भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. चिमुर तालुक्यातील पिंपळनेरी, शंकरपूर, आष्टी परिसरातून बाधित ठरले आहे.

00000