Search This Blog

Tuesday, 3 August 2021

जिल्ह्यात मंगळवारी 3 कोरोनामुक्त

 

जिल्ह्यात मंगळवारी 3 कोरोनामुक्त, 5 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 3 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 5 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 5 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 5, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 85 हजार 35 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 437 झाली आहे. सध्या 64 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 22 हजार 530 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 34 हजार 588 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

सोमवार ते शुक्रवार बाजारपेठेची वेळ आता रात्री 8 वाजेपर्यंत

 

सोमवार ते शुक्रवार बाजारपेठेची वेळ आता रात्री 8 वाजेपर्यंत

Ø शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत तर रविवारी संपुर्णत: बंद

चंद्रपूर दि. 3 ऑगस्ट : सर्व अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना (शॉपिंग मॉल सह) सुरु ठेवण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असून सदर दुकाने शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरू राहतील. तर अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने व मॉल रविवारी संपूर्णतः बंद राहतील.

सद्यस्थितीत स्तर-3 मधील लागू असलेल्या निर्बंधामध्ये केलेल्या सुधारणा चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 3 ऑगस्ट 2021 पासून लागू करण्यात येत आहे.

सर्व सार्वजनिक उद्याने व क्रीडांगणे व्यायाम, चालणे, धावणे सायकलींग करिता सुरू राहतील. सर्व शासकीय व खाजगी कार्यालय संपूर्ण क्षमतेने सुरू राहतील. ज्या कार्यालयामध्ये यापूर्वी वर्क फ्रॉम होम पद्धतीने कामकाज सुरू होते ते यानंतरही सुरू राहतील. सर्व कृषी विषयक कामे, बांधकाम, औद्योगिक प्रक्रिया, मालवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.

व्यायाम शाळा, योगा केंद्र, केस कर्तनालय, ब्युटीपार्लर, स्पा इ. आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह वातानुकूलित यंत्राच्या वापराशिवाय सुरू ठेवता येतील. सदर आस्थापना रविवारी संपूर्णतः बंद राहतील.

सर्व उपाहारगृहे, रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के आसनक्षमतेने डायनिंगसाठी कोरोना वर्तणूकविषयक नियमांचे पालन करून सुरू राहतील. तथापि दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत केवळ पार्सल, घरपोच सुविधा सुरू राहतील. तसेच शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील. केवळ पार्सल व घरपोच सुविधा सुरू राहतील.

जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. सर्व सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स (सिंगलस्क्रीन तसेच मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. शाळा व महाविद्यालयाकरीता राज्यशिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश लागू राहतील.

कोणत्याही नागरिकास रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. गर्दी टाळण्याकरिता वाढदिवस साजरा करणे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार, मेळावे, निषेध मोर्चे यावरील निर्बंध पुर्ववत राहतील.

नागरिकांनी सर्व कोरोना वर्तणूक विषयक नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक असेल.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.3 ऑगस्ट 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.

00000

Monday, 2 August 2021

सोमवारी एकही मृत्यु नाही, 8 कोरोनामुक्त

 

सोमवारी एकही मृत्यु नाही, 8 कोरोनामुक्त, 3 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 2 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 8 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 3  जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 3 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0,  बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 85 हजार 30 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 434 झाली आहे. सध्या 62 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 20 हजार 489  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी  5 लाख 32 हजार 732 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

देश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद - पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार




 

देश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद

- पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

चंद्रपूर दि. 2 ऑगस्ट : लोकांच्या हातांना रोजगार देणे हे आपले पहिले प्राधान्य असून आरोग्य आणि रोजगार यावर अधिक भर देण्यात येत आहे. तसेच येथे येणार्‍या देश विदेशातील पर्यटकाला वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचासुद्धा आनंद घेता येईल, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

रेशीम संचालनालयामार्फत आयोजित टसर रेशीम पर्यटन विकास केंद्र आगरझरी येथे आयोजित भुमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) जी. गुरुप्रसाद, क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, सहाय्यक संचालक श्री. ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात नव्याने उभा राहत असलेल्या रेशीम प्रकल्पाच्या व्हीजनला व कार्याला कोठेही अडथळा येणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकल्पाला भरीव आर्थिक मदत उपलब्ध करून देत सुंदर असा प्रकल्प याठिकाणी साकारेल. तसेच टसर रेशीम प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरातील स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार प्राप्त होईल.

पालकमंत्री पुढे म्हणाले, एखाद्या अधिकाऱ्यांमध्ये काही करायची धडपड असेल तर त्या कार्याला मूर्तरूप ते देऊ शकतात. आरमोरी आणि पाथरी या ठिकाणी रेशीमचे उत्पादन व्हायचे व या ठिकाणी विक्री केंद्रे सुद्धा होती. रेशीमच्या कापडाला बाजारात आजही मोठी मागणी असून रेशीमच्या कापडाची वेगळीच ख्याती आहे. त्यावेळी मच्छीमार बांधवांना मच्छिमारी बरोबरच दुसरा व्यवसाय म्हणजेच रेशीम व्यवसाय होता. आज पैठणी साडी तसेच लेनीन कापड यामध्येसुद्धा रेशीमचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यामुळे देश-विदेशातून येणारे पर्यटक या प्रकल्पाला भेट देतील. येथे येणाऱ्या पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटन अनुभवास मिळेल.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले की,  अतिशय चांगला व गावातील नागरिकांना रोजगार देणारा हा प्रकल्प ज्या ठिकाणी उभा राहत आहे. त्यामुळे निश्चितच या गावातील स्थानिक नागरिकांना या माध्यमातून रोजगार तर मिळेलच पण त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही मदत मिळेल. ताडोबा मध्ये देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. ताडोबा सोबतच टसर सिल्क या प्रकल्पाच्या माध्यमातून टसर पर्यटन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत म्हणाल्या की, पूर्व विदर्भातील कर्वती साडीला जीआय टॅगिंग मिळाली आहे. प्रकल्प कोणत्याही कानाकोप-यात उभा केला तर तो लोकांच्या दृष्टीला पडणार नाही. यासाठी ज्या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक येतात त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्याचा विचार होता. वनविभागाच्या मदतीने एक एकराची जमीन या प्रकल्पास उपलब्ध झाली आहे. येथील प्रशासनामुळे व त्यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास येईल. हा प्रकल्प म्हणजे पर्यटन आणि रेशीम यांच्या समन्वयातून निर्माण होणारा प्रकल्प आहे, असेही त्या म्हणाल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना रेशीम प्रक्रिया कशी चालते? आणि त्याच्यातून माल कसा उत्पादित केला जातो? हे लाईव्ह बघता येणार आहे. तसंच उत्पादकांना छोटे स्टॉल याठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे व त्या ठिकाणी सदर उत्पादने विक्रीला असतील. गावातील स्थानिक नागरिकांना व बचत गटांना सदर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी टसर प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली.

00000

Sunday, 1 August 2021

रविवारी एकही मृत्यु नाही, 4 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह

 


रविवारी एकही मृत्यु नाही, 4 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0,  बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 1, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 85 हजार 27 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 426 झाली आहे. सध्या 67 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 19 हजार 717 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी  5 लाख 31 हजार 292 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

00000