Search This Blog

Sunday, 7 November 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 7 नोव्हेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 सोमवार दि.8 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता सावली येथे आगमन व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे तालुक्यातील पक्ष नोंदणी शुभारंभ व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा.

दुपारी 1 वाजता सावली येथून बल्लारपूर कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता बल्लारपूर येथे आगमन व श्री.अब्दुल करीम यांच्याकडे सदिच्छा भेट. दुपारी 2.30 वाजता गांधी भवन, बल्लारपूर येथे बल्लारपूर तालुक्यातील पक्ष नोंदणी शुभारंभ व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा.

सायंकाळी 5 वाजता बल्लारपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.35 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित होणाऱ्या विश्वरत्न विशेषांकाचे प्रकाशन सोहळ्यास उपस्थित. सायंकाळी 6 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. रात्री 8.30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार दि. 9 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता पैनगंगा कोल माइन्स ता. कोरपना येथे आगमन व पैनगंगा कोल माईन्स विश्रामगृह येथे पैनगंगा कोल माईन्स संबंधित शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण, मोबदला व पुनर्वसन संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी 11 वाजता पैनगंगा ता. कोरपना येथून चंद्रपूर कडे प्रयाण.

दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील फायर फायटींग संबंधित आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता अल्ट्राटेक सिमेंट उद्योगातील कामगार आणि पर्यावरणाबाबत आढावा बैठक.  दुपारी 1 वाजता कार्पेट क्लस्टर संबंधात आढावा बैठक. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

0000000

Saturday, 6 November 2021

शनिवारी जिल्ह्यात 1 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 12

शनिवारी जिल्ह्यात 1 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 12

 चंद्रपूर, दि. 6 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये कोरपना येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 818 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 264 झाली आहे. सध्या 12 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 38 हजार 34 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 47 हजार 965 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Friday, 5 November 2021

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 1 कोरोनामुक्त

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 1 कोरोनामुक्त

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 11

चंद्रपूर, दि. 5 नोव्हेंबर :  जिल्ह्यात शुक्रवारी (दि.5) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 817 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 264 झाली आहे. सध्या 11 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 37 हजार 750 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 47 हजार 672 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Thursday, 4 November 2021

गुरुवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

 गुरुवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 12

चंद्रपूर, दि. 4 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात  एकाने कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये कोरपना येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 817 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 263 झाली आहे. सध्या 12 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 37 हजार 697 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 47 हजार 593 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Wednesday, 3 November 2021

बुधवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 1 बाधित

बुधवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 12

चंद्रपूर, दि. 3 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये कोरपना येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 816 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 262 झाली आहे. सध्या 12 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 36 हजार 747 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 46 हजार 737 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.