Search This Blog

Tuesday, 1 April 2025

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल रोजी

 


महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल रोजी

Ø चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1442 पात्र मतदार

चंद्रपूरदि. 1 एप्रिल  : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक - 2025 साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 3 एप्रिल 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीकरिता एकूण 41 उमेदवार रिंगणात आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 1442 पात्र मतदार यांच्याकडून गुप्त मतदानाद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. मतदान सकाळी 8 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. यासाठी चंद्रपूर मुख्यालय येथे 3 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

सदर मतदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय जवळरामनगरचंद्रपूर येथे होणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय इमारत मधील अधिष्ठाता यांच्या दालनासमोरील कक्ष खोली क्रमांक 1 मध्ये 1 ते 480 पर्यंत मतदार संख्याप्रशासकीय इमारत मधील परिचारिका कक्ष खोली क्रमांक 2 मध्ये 481 ते 967 मतदार आणि प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय अधिकारी यांचे दालन खोली क्रमांक 3 मध्ये 968 ते 1442 मतदार संख्या राहणार आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक - 2025 साठी सर्व पात्र मतदारांनी वरीलप्रमाणे संबंधित मतदान केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत आपल्या मतदानाचा अधिकार बजावावाअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

000000

आदिवासी लोककलेतून आदर्शवत संस्कृतीचे दर्शन – मंत्री डॉ. अशोक उईके












 आदिवासी लोककलेतून आदर्शवत संस्कृतीचे दर्शन – मंत्री डॉ. अशोक उईके

Ø आदिवासी लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नेणार – मंत्री आशिष शेलार

Ø कोरपना येथे आदिवासी लोककला महोत्सवाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हा तालुका राज्याच्या टोकावर असून हा भाग आदिवासी बहुल आहे. जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण करणा-या आदिवासींमुळेच संस्कृती जिवंत राहिली आहे. त्यांच्या लोककलेतून एका आदर्शवत संस्कृतीचे दर्शन आपल्याला होते, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

कोरपना येथे सांस्कृतिक कार्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या विशेष सहकार्याने आयोजित आदिवासी लोककला महोत्सवात अध्यक्ष म्हणून मंत्री डॉ. उईके बोलत होते. यावेळी मंचावर सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, कोरपनाच्या नगराध्यक्षा नंदा बावणे, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, सांस्कृतिक विभागाच्या प्रज्ञा पाटील, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, आदिवासी कला आणि संस्कृती ही गौरवप्राप्त आहे. अशा संस्कृतीचे दर्शन राज्यात व्हावे, यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आदिवासी माणसाने कायम संस्कृती जपली आहे. देव, समाज, धर्म आणि संस्कृतीचे पालन करणारा हा समाज आहे. त्यांच्यामुळेच ही संस्कृती निरंतर जिवंत राहणार आहे. राज्याचा आदिवासी विकास मंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदिवासीबहुल या क्षेत्राकडे 100 टक्के लक्ष राहील. आमदारांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील, असे डॉ. अशोक उईके यांनी आश्वस्त केले.

आदिवासी लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नेणार – ना.आशिष शेलार

आदिवासी लोककला महोत्सव एक पर्वणी आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन अतिशय चांगले केले आहे. भारताच्या कानाकोप-यात आदिवासींचा आवाज बुलंद होईल, अशी त्यांची संस्कृती आहे. राज्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आदिवासी लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व तालुक्यात आनंदाचाचा आलेख वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकांच्या चेह-यावर आनंद झळकत आहे. 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत वर्ल्ड ऑडिओ – व्हिज्युअल समीट होत आहे. तेथे आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीजमध्ये सुध्दा आदिवासी संस्कृती आणि त्यांची कला रुजविण्यासाठी प्रयत्न करणार, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदिवासी समाज हा कष्टकरी आणि प्रामाणिक आहे. आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्वाचे आहे. आदिवासींच्या विकासाच्या संकल्पाचा हा विषय आहे. सन 2036 मध्ये होणा-या ऑलिंपिकमध्ये चंद्रपूर – गडचिरोलीतील आदिवासी खेळाडू झळकले पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. देशाच्या विकासात चंद्रपूरचे योगदान महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार देवराव भोंगळे म्हणाले, कोरपना हा राज्याच्या शेवटच्या टोकावर आहे. माझ्या विधानसभा मतदार संघात कोरपना, जिवती आणि राजुरा हे तीन पेसा तालुके आहेत. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे तीन तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्ट शिखर सर करू शकले. कोरपना तालुक्यात आदिवासी सांस्कृतिक भवनासाठी 15 कोटी, माणिकगड किल्ला आणि विष्णु मंदिराचे जतन करण्यासाठी 10 कोटी, गडचांदूर आणि कोरपना तालुक्याच्या विकासाठी प्रत्येकी 10 कोटी तसेच या दोन्ही तालुक्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी द्यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार मुख्याधिकारी यमाजी धुमाळ यांनी मानले.  

या समुहांनी सादर केल्या लोककला : जय लिंगो जय जंगो गोंडी लोकनृत्य मंडळ, जयसेवा गोंडी नृत्य मंडळ लोहारा, कोयावनसी लंका पती राजा रावण ढेमसा मंडळ चनई, जय रावण जय हिरासकू ढेमसा मंडळ देवूबाई गुडा, गोंडी ऑक्रेस्ट्रा, फॅन्सी ड्रेस, जय लिंगो जय जंगो हिरासकू ढेमसा मंडळ खैरगाव, जय लिंगो जय जंगो ढेमसा मंडळ भेंडवी, गोंडी ढेमसा मंडळ राजूरा, गोंडी ढेमसा नृत्य मंडळ खरारपेठ, घाटराई माथा घुसाडी मंडळ हातलोनी, आदिवासी मुलींचे वसतीगृह गडचांदूर, आदिवासी मुलींचे वसतीगृह कोरपना, जिल्हा परिषद प्राथ. शाळा चनई, जि.प. प्राथ. शाळा आसन, फाल्गुनी मसराम यांनी विविध आदिवासी लोककला सादर केल्या.

००००००

100 दिवस कृती आराखड्याचा जिल्हाधिका-यांकडून आढावा


 

100 दिवस कृती आराखड्याचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

            चंद्रपूर, दि. 1  एप्रिल : राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरीता पहिल्या 100 दिवसांमध्ये सात मुद्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याच्या राज्य शासनाच्या सुचना आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.1) विभाग प्रमुखांचा आढावा घेतला.

            जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार, अतुल जटाळे (पुनर्वसन), आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) सीमा गजभिये आदी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 100 दिवस कृती आराखडा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. मुख्यालय स्तरावरून याचा नियमित आढावा घेण्यात येत असून या उपक्रमाला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपल्या विभागाची अपडेट माहिती अपलोड करावी. कार्यालयीन कामकाज जसे आस्थापना, लेखा, जडवस्तु संग्रह, निर्लेखन व इतर विषय परिपूर्ण ठेवावेत. प्रत्येक विभाग प्रमुखांनी आठवड्यातून किमान एक दिवस क्षेत्रीय भेटी द्याव्यात. तसेच सर्व अधिकारी- कर्मचा-यांसोबत बैठक घ्यावी. जेणेकरून सुसंवाद वाढण्यास मदत होईल. तसेच कार्यालयातील कर्मचा-यांना आणि बाहेरून आलेल्या अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ठेवावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

००००००

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 56 उमेदवारांची प्राथमिक निवड


 पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 56 उमेदवारांची प्राथमिक निवड

         चंद्रपूरदि.1 एप्रिल : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमॉडल करीअर सेंटरआणि जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 56 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

          कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवारअध्यक्षस्थानी जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्य, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे उपस्थित होते.

यावेळी आमदार श्री. जोरगेवार यांनी,  चंद्रपूर जिल्हा उद्योग हब बनणार असून जिल्हयात विविध कंपन्या येणार आहे. यातून कुशलअकुशल रोजगार निमार्ण  होईल. तरी उमेदवारंनी अधिकाधिक अनुभव प्राप्त करून नोकरी करावी व कोणतेही काम करताना न्यूनगंड बाळगू नये, असा सल्ला दिला. 

अमोल गायकवाड म्हणाले, उमेदवारांनी छोटे छोटे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स करावे व त्यातून उद्योजक बनावे. उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी, सदर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील कंपन्यामध्ये रुजू व्हावे. मिळेल ते काम करावे, अनुभव प्राप्त करावा व कामाच्या नवनवीन संधी शोधाव्यात. तसेच आपल्या कुटंबाचा उदरनिर्वाह करावा, असे सांगितले.  यावेळी ऋतुराज सुर्य यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनेची माहिती दिली.

सदर रोजगार मेळाव्यात विदर्भ क्लिक वन सोल्यूशन चंद्रपूरडिस्कॉन प्रा. लि. नागपूरसंसूर सृष्टी इंडिया प्रा.लि. चंद्रपूर, वैभव इंटरप्रायझेसनागपूरएल.आय.सी. ऑफ इंडिया,  उत्कर्ष स्माल फायनन्स बॅकनागपूर टाटा ट्रस्ट प्रा. लि. नागपूर आदी नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात 173 उमेदवार उपस्थित होते त्यापैकी 56 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मार्गदर्शन अधिकारी रोशन गभाले यांनी केले. इतर सर्व अधिकारी -कर्मचारी  यांच्या सहकार्याने रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.

०००००

सावली तालुक्यात ‘जिवंत सातबारा’ मोहीम

 सावली तालुक्यात ‘जिवंत सातबारा’ मोहीम

चंद्रपूरदि.1 एप्रिल :  राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि 19 मार्च 2025 च्या शासन निर्णयान्वये सावली तालुक्यामध्ये जिवंत सातबारा  मोहिम राबविण्यात येत आहे.  या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावरील खातेदारापैकी मय्यत खातेदार असतील, अशा मय्यत खातेदारांचे वारस चढविण्याबाबत 1 ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत तलाठी  यांच्यामार्फत गावांमध्ये होणाऱ्या चावडी वाचनमध्ये नागरिकांनी मय्यत खातेदारांची  माहिती तलाठ्यांना देणेयावरून तलाठी गावातील मय्यत खातेदारांची यादी तयार करतील.

6 ते 20 एप्रिल पर्यंत वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्यु दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञापत्रघोषणा पत्रसरपंचपोलीस पाटीलग्रामसेवकाचा दाखलासर्व वारसांचे नावमत्तादुरध्वनी क्रमांकरहिवासी बाबत पुरावा) तलाठ्याकडे सादर करावे.  21 एप्रिल ते 10 मे या कालावधीत  तलाठी फेरफार घेवून मय्यत खातेदारांचे नाव सातबार वरून कमी करून वारसांचे नावे दर्ज करतील. 

तरी सर्व शेतकरी बांधवांनी ‘जिवंत सातबारा’ मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी केले आहे.

००००००