Search This Blog

Tuesday, 1 April 2025

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल रोजी

 


महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल रोजी

Ø चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1442 पात्र मतदार

चंद्रपूरदि. 1 एप्रिल  : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक - 2025 साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 3 एप्रिल 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीकरिता एकूण 41 उमेदवार रिंगणात आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 1442 पात्र मतदार यांच्याकडून गुप्त मतदानाद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. मतदान सकाळी 8 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. यासाठी चंद्रपूर मुख्यालय येथे 3 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

सदर मतदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय जवळरामनगरचंद्रपूर येथे होणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय इमारत मधील अधिष्ठाता यांच्या दालनासमोरील कक्ष खोली क्रमांक 1 मध्ये 1 ते 480 पर्यंत मतदार संख्याप्रशासकीय इमारत मधील परिचारिका कक्ष खोली क्रमांक 2 मध्ये 481 ते 967 मतदार आणि प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय अधिकारी यांचे दालन खोली क्रमांक 3 मध्ये 968 ते 1442 मतदार संख्या राहणार आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक - 2025 साठी सर्व पात्र मतदारांनी वरीलप्रमाणे संबंधित मतदान केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत आपल्या मतदानाचा अधिकार बजावावाअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment