मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
प्रशिक्षणार्थ्यांनी आधार पडताळणी करणे बंधनकारक
चंद्रपूर, दि. 8 एप्रिल : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी 10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल, अशा प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव 5महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, क्य, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmkpy.mahaswayam.
10 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थीना रुजू करून घेण्यात येणार नाही. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी अनिवार्य आहे, ज्या बैंक अकाऊंटला आधार लिंक आहे, तोच बैंक अकाऊंट नंबर योजनेच्या विद्यावेतन DBT साठी नमुद करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थ्यांच्या आधार पडताळणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे :
योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.
आधार पडताळणी झाल्याशिवाय पोर्टलवर हजेरी दर्शविता येणार नाही. प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे तसेच, आस्थापना/नियोक्ते यांनी कागदपत्रे तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांच्याशी 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यावी.
याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment