Search This Blog

Friday, 4 April 2025

महाकाली यात्रेनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

 

महाकाली यात्रेनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

चंद्रपूरदि. 4 एप्रिल : चंद्रपुर शहरात माता महाकाली यात्रेला 3 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. महाकाली यात्रेमध्ये येणा-या भाविकांसाठी एकेरी मार्ग आहे. त्यामुळे यात्रेच्या कालावधीदरम्यान जटपुरा गेट येथे जास्त गर्दी होत असते. त्या अनुषंगाने शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम- 1951 च्या कलम 33-(1) ब नुसार सार्वजनिक ठिकाणी चंद्रपूर शहरातील रहदारी सुरळीत चालावीरहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निमार्ण  होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नयेम्हणून 3 ते 13 एप्रिल पर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याची अधिसुचना जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केली आहे.

सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहील . तसेच अचंलेश्वर गेट ते बागला चौकअचंलेश्वर गेट ते कोहीनुर तलावकडे जाणारा रोड व महाकाली मंदीर पार्कींग ते आर के. चौक हा नो पार्कींग झोन  व नो हॉकर झोन घोषित करण्यात येत आहे. महाकाली मंदीर समोरून गौतम नगरकडे जाणारा रस्ता सर्व वाहनाकरीता बंद राहणार आहे.

नागरिकांसाठी पर्यायी  मार्ग : बागला नगरमहाकाली वार्डभिवापूर वार्ड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर- हनुमान खिडकी- दादमहल वार्ड  या मार्गाचा  वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. बागला नगर, महाकाली वार्डभिवापूर वार्ड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी चारचाकी वाहनांने शहरात जायचे असल्यास किंवा बाहेर जायचे असल्यास लालपेठ कॉलरी-पठाणपुरा गेट- गांधी चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा.

यात्रेकरीता येणाऱ्या वाहनाकरीता पार्कींग व्यवस्था : 1. नियोजित वाहनतळांची नावे पुढीलप्रमाणे आहे. कोहीनुर तलाव मैदान येथे जिप कार, (टॅम्पोआईचर आणि त्यापेक्षा मेाठे जड वाहनांना या पार्कींग स्थळी प्रवेश दिला जाणार नाही.) 2. इंजिनिअरींग कॉलेज ते भिवापुर मार्केट रस्त्याच्या दोन्ही बाजुला तेलंगणा व आंध्रप्रदेशातुन येणा-या बसेसची व्यवस्था 3. डी. एङ कॉलेज मैदान (जुनी बाबुपेठ पोलिस चौकीच्या बाजुला) सर्व प्रकारचे वाहन 4. न्यु इंग्लींश हायस्कुल मैदानात राज्य परिवहनच्या बसेस करीता (विश्राम गृह समोर) 5. बैलबाजार पार्कींग क्र.1 व पार्कींग क्र.2 मध्ये सर्व प्रकारचे वाहन 6. नयरा पेट्रोल पंप (बायपास रोडआंबेडकर चौक)  सर्व प्रकारचे वाहन

०००००

No comments:

Post a Comment