दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेबाबत कार्यशाळा
चंद्रपूर, दि, 24 एप्रिल : 11 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत विभागाच्या विविध योजनाच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहात कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा व कृषी गट तयार करून कृषी संबंधित योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी लाभार्थ्यांना मान्यवरांनी कृषी सबंधित योजनांची माहिती दिली व लाभार्थ्यांच्या शेतीसबंधित अडी-अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रतिभा भागवतकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन दिपक धात्रक, एम.एस. माकोडे, स्मिता बहिरमवार, श्वेता लक्कावार, पुनम आसेगावकर तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००

No comments:
Post a Comment