Search This Blog

Thursday, 17 April 2025

वन अकादमीला ‘आयएसओ’ प्रमाणपत्र



 वन अकादमीला ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

चंद्रपूरदि. 17 एप्रिल : गुणवत्ताशाश्वत पर्यावरणीय व्यवस्थापन आणि वनसंवर्धनाच्या दिशेने घेतलेल्या पुढाकारांची दखल घेत चंद्रपूर वन प्रशासनविकास व व्यवस्थापन अकादमीला (वन अकादमी) प्रतिष्ठित ‘आयएसओ 9001:2015’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र अकादमीला पर्यावरण व्यवस्थापनवन व्यवस्थापनवन्यजीव संरक्षणवनाग्नी प्रतिबंधइको-टुरिझम व मानव-प्राणी संघर्ष निवारण या क्षेत्रात दाखविलेल्या उत्कृष्टतेबद्दल मिळाले आहे. अकादमीची कार्यप्रणालीप्रशिक्षण पद्धती व व्यवस्थापन प्रणाली जागतिक दर्जाच्या निकषांनुसार आहेत, हे यावरून सिध्द झाल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी म्हटले आहे.

सोबतच भारत सरकारच्या Capacity Building Commission कडून अकादमीला Very Good (ट्रिपल स्टार) प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आले आहे.

वन अकादमीबद्दल माहिती : 1961 मध्ये वनपाल प्रशिक्षण विद्यालय’ म्हणून सुरू झालेली ही संस्था आज 44.5 हेक्टर परिसरात विस्तारली असून त्यात 16 प्रशिक्षण कक्ष, 4 प्रेक्षागृहेअधिकारी निवासस्थानेमहिला व पुरुष प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहेक्रीडा संकुलव्यायामशाळा आणि आधुनिक डिजिटल वर्ग यांचा समावेश आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रात्यक्षिक अनुभवक्षेत्रभेटी व तांत्रिक कौशल्य विकासावर आधारित असूनपर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज अशा भावी वन अधिकाऱ्यांची घडण या माध्यमातून केली जाते.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात या अकादमीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून ती शाश्वत वनीकरणजैवविविधता संवर्धन व पर्यावरणीय नेतृत्व क्षेत्रात ठोस भूमिका बजावत आहे.

००००००

No comments:

Post a Comment