मत्स्यविभागाच्या योजनांसाठी संपर्क करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि, 29 एप्रिल : जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य व योजनांच्या लाभासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी कळविले आहे.
तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान : भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय अंतर्गत नॉयलॉन / मोनोफिलॅमेंट तयार जाळी खरेदीवर प्रती सभासद वैयक्तिक मच्छिमारास 20 कि.ग्रॉ. पर्यंत. यासाठी 50 टक्के अनुदान देय राहील. जाळयाच्या किंमतीची कमाल मर्यादा प्रती कि.ग्रा. 800 रुपये राहील.
बिगर यांत्रिकी नौकेसाठी खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.
लाकडी नौका : प्रकल्प किंमत 60 हजार रुपये अनुज्ञेय अनुदान. प्रकल्प किंमतीच्या 50 टक्के अथवा 30 हजार रुपये, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील. पत्रा नौका : प्रकल्प किंमत 30 हजार रुपये, किमतीच्या 50 टक्के अथवा 15 हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील. फायबर नौका : प्रकल्प किंमत 1 लक्ष 20 हजार रुपये, प्रकल्प किमतीच्या 50 टक्के अथवा 60 हजार रुपये, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय सहील, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment