साथी पोर्टलवर बियाणे विक्रीबाबत प्रशिक्षण
चंद्रपूर, दि. 4 एप्रिल : कृषी विभाग तसेच पंचायत समिती चंद्रपूर आणि सावली यांच्या संयुक्त विद्यमाने सावली तालुक्यातील कृषी केंद्र धारकांची खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक तसेच साथी पोर्टल वर बियाणे विक्रीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी संगिता भांगरे, तर प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा कृषी अधिकारी जयंत धात्रक, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्री. बोढे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोहिम अधिकारी लंकेश कटरे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी यांनी उपस्थित कृषी केंद्र संचालकांना खरीप हंगाम 2025-26 मध्ये साठा पुस्तक, ई-पॉस मशीन अद्यावत ठेवण्याच्या सुचना दिल्या. तसेच शेतक-यांना उच्च दर्जाचे बी-बयाणे व रासायनिक खते पुरविण्याबाबत मागदर्शन केले. शासनाच्या निर्देशान्वये सन 2025-26 पासून साथी पोर्टल वरून बियाणे विक्री करणे बंधनकारक असल्याने याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मोहीम अधिकारी श्री. धात्रक यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. तसेच खरीप हंगामात कृषी संचालकांना उद्भवणाऱ्या शंकाचे निराकरण केले.
कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी दिनेश आत्राम यांनी तर आभार उमेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी (कृषी) अमोल उघडे यांच्यासह चंद्रपूर व सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment