गीग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी 15 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी
चंद्रपूर, दि. 8 एप्रिल : गिग कामगारांसमोरील वाढलेली आव्हाने, कामाची खराब परिस्थिती, कामाचे अनियमित तास, अस्थिर उत्पन्न, इ. उदयोन्मुख समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक असून त्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने सर्व गीग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना ई-श्रम पोर्टलवर 15 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तसेच सहायक कामगार आयुक्त यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
भारत सरकार, कामगार आणि रोजगार मंत्रालय हे संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करून त्यांची प्रतिष्ठा सुधारण्यासाठी सतत कार्यरत आहे. प्लॅटफॉर्म इकॉनॉमी हे भारतातील आणि जागतिक स्तरावरील एक उदयोन्मुख क्षेत्र आहे आणि अलीकडील काळात रोजगार निर्मितीचा एक महत्वाचा स्त्रोत बनला आहे.
भारत सरकार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी देशातील असंघटीत स्थलांतरित कामगारांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) देऊन त्यांची नोंदणी करण्यासाठी ई -श्रम पोर्टल सुरू केले आहे.
कोण करू शकतात नोंदणी : झोमॅटो, स्वीग्गी, ओला, अर्बन कंपनी, फ्लीपकार्ट, ॲमेझॉन व इतर कोणत्याही डिजीटल प्लॅटफॉर्मवर काम करणारे डिलिवरी बॉय, चालक, फ्रि-लान्सर, घरगुती सेवा पुरवठादार व इतर तत्सम असंघटित कामगार,
नोंदणीसाठी पात्रता : वय 16 ते 59 असावे, आयकर भरणारा नसावा, EPFO व ESIC चे सदस्य नसावे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रके : आधारकार्ड, आधारकार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबर, पॅन कार्ड,
नोंदणीसाठी आपल्या नजीकच्या महा ई-सेवा केंद्र, इमारत व इतर बांधकाम कामगार सुविधा केंद्राला भेट द्या किंवा http://register.eshram.gov.in/
अधिक माहितीसाठी सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, चंद्रपूर येथे संपर्क करावा.
०००००
No comments:
Post a Comment