25 एप्रिलपर्यंत करता येणार चना खरेदी नोंदणी
चंद्रपूर, दि. 4 एप्रिल : हंगाम 2024-25 मध्ये शासनाच्या पीएसएस योजने अंतर्गत चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी करण्याची मुदत 25 एप्रिल 2025 पर्यंत आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार चंद्रपूर जिल्ह्यात एनसीसीएफ मार्फत चना खरेदी सुरू करण्यात येणार असून शेतकरी नोंदणीची मुदत 30 दिवस पुढे करण्याच्या सुचना प्राप्त झाल्याने आता शेतक-यांना 25 एप्रिलपर्यंत चना खरेदी नोंदणी करता येईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांनी कळविले आहे
या खरेदी केंद्रावर करू शकता शेतकरी नोंदणी : 1. चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सह. संस्था मर्या. चंद्रपूर, खरेदी केंद्र- चिमुर, 2. कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर, खरेदी केंद्र- चंद्रपूर, 3. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा, खरेदी केंद्र-वरोरा
०००००
No comments:
Post a Comment